कारखान्याने 3 वर्षांपासून पगारच न दिल्याने कर्मचाऱ्याची आत्महत्या, मृतदेह ताब्यात घेण्यास पत्नीचा नकार

कारखान्याने 3 वर्षांपासून पगारच न दिल्याने कर्मचाऱ्याची आत्महत्या, मृतदेह ताब्यात घेण्यास पत्नीचा नकार

मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे हा मृतदेह करमाळा कुटीर रुग्णालयात गेल्या 22 तासांपासून ठेवण्यात आला आहे.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात, करमाळा, 25 जानेवारी : मागील 46 महिन्यांपासून पगार मिळत नसल्यामुळे साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना करमाळा तालुक्यात घडली आहे. 'आदिनाथ' साखर कारखानाच्या कर्मचाऱ्याने काल (शुक्रवारी) आत्महत्या केली. मात्र त्यांचा मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे हा मृतदेह करमाळा कुटीर रुग्णालयात गेल्या 22 तासांपासून ठेवण्यात आला आहे.

'मयत राजेंद्र बलभीम जाधव यांच्या पत्नीच्या नावावर आदिनाथ कारखान्याकडे येणे असलेली सर्व पगाराची रक्कम तात्काळ जमा करावी. त्याच्या पत्नीला आदिनाथमध्ये कामाला घ्यावे. कर्मचार्‍यांच्या नावावर आयसीसीआय बँकेतून आदिनाथ कारखाना काढलेले कर्ज तात्काळ भरावे. त्यानंतरच आम्ही हा मृतदेह ताब्यात घेऊ,' अशी भूमिका मयताच्या नातेवाईकांनी घेतली आहे.

कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर आदिनाथ कारखान्याच्या सर्वेसर्वा रश्मी बागल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण 'मागन्या मान्य न झाल्यास या मृतदेहाचा अंत्यसंस्कार रश्मी बागल यांनी करावा,' अशी प्रतिक्रिया मयताचा भाऊ ब्रह्मदेव जाधव यांनी दिली आहे.

अपहरणाच्या घटनेनं भिवंडी हादरलं, मुलगी घरातून अचानक बेपत्ता

दरम्यान, करमाळाचे तहसीलदार समीर माने मयत जाधव यांच्या घरी गेले असून मृतदेह ताब्यात घेण्याचीची विनंती करत आहेत. या सर्व प्रकारामुळे आदिनाथ कारखाना परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी गेल्या 15 दिवसापासून आदिनाथ कारखान्याच्या कार्यस्थळावर साखळी उपोषणासाठी आपल्या कुटुंबासह बसलेले आहेत.

First published: January 25, 2020, 11:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading