शिवसेनेला धक्का! काँग्रेसची ताकद वाढणार, रणजितसिंह देशमुख परतले स्वगृही

शिवसेनेला धक्का! काँग्रेसची ताकद वाढणार, रणजितसिंह देशमुख परतले स्वगृही

2003 च्या दुष्काळात सोनिया गांधी यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्याचं केलं होतं यशस्वी संयोजन

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर: माणगाव खटावचे जिल्हा परिषद माजी सदस्य आणि शिवसेनेचे तरुण नेते रणजितसिंह देशमुख (leader Ranjitsinha Deshmukh) स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार आहेत. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यासह काही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह देशमुख थोड्याच वेळात काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

यासोबतच महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीस दयानंद चोरघे यांनी भाजपला रामराम करत आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ठाणे जिल्हापरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दयानंद चोरघे यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा..BREAKING: अर्णब गोस्वामी यांनी तुरुंगात वापरला मोबाईल, दोन पोलीस निलंबित

काँग्रेसची ताकद वाढणार

जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माण-खटाव विधानसभा मतदारसंघात पक्षाचं नुकसान झालं होतं. आता रणजितसिंह हे स्वगृही परतल्यानं काँग्रेसची ताकद आणखी वाढणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

रणजितसिंह देशमुख यांच्या पक्ष प्रवेशामुळे माण-खटाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष तसेच सातारा जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष उभारी घेईल, असा विश्वास जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.

कोण आहेत रणजितसिंह देशमुख?

रणजितसिंह देशमुख हे आधी काँग्रेसमध्येच होते. मात्र, 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. रणजितसिंह देशमुख हे सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2007 साली जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर विकास कामे करत माण- खटाव तालुक्यात त्यांनी काँग्रेस पक्षाची पाळुमुळे घट्ट केली. 2003 च्या दुष्काळात सोनिया गांधी यांच्या दुष्काळी तालुक्यांच्या पाहणी दौऱ्याचे यशस्वी संयोजन त्यांनी केले होते. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सातारा दौरा यशस्वी करण्यामागे तत्कालीन युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र काही कारणास्तव त्यांनी 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

कल्पकता राज्याला ठरली दिशादर्शक...

दरम्यान, महाराष्ट्रातील सहकारी सुतगिरणी व्यवसायाला नवी दिशा देणारे रणजितसिंह देशमुख यांची कल्पकता राज्याला दिशादर्शक ठरत आहे. रणजितसिंह देशमुख यांनी फिनिक्स ऑर्गनायझेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून माण-खटाव या दुष्काळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचं काम करत जलसंधारणाची कामे पूर्ण केली.

हेही वाचा...'बजरंगी भाईजान’मधील अभिनेत्याचा मृत्यू, 24 तासांआधीच आईचं निधन

एवढंच नाही तर त्यांनी वृक्ष लागवड कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात राबवले. त्याचबरोबर महिला व युवकांना स्वंयम रोजगार प्रशिक्षण, स्वंयम सहाय्यता गटांची निर्मिती आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिर यासह अनेक सेवाभावी उपक्रम सुरू केले आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: November 11, 2020, 11:44 AM IST

ताज्या बातम्या