मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राजकारण तापलं, शिवसेनेच्या नेत्याने केली सडकून टीका

फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राजकारण तापलं, शिवसेनेच्या नेत्याने केली सडकून टीका

दिल्लीतील हालचालींबाबत शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दिल्लीतील हालचालींबाबत शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दिल्लीतील हालचालींबाबत शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

जळगाव, 17 जुलै : मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये भाजपकडून कॉंग्रेस सरकार पडण्याच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. राजस्थाननंतर महाराष्ट्रात देखील हा प्रयोग भाजपकडून होईल, असं बोललं जात आहे. त्यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे दिल्लीत दाखल झाल्यामुळे या चर्चांनी अधिकच वेग पकडला आहे. दिल्लीतील हालचालींबाबत शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना विचारण्यात आले असता, त्यांनी मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसचं संख्याबळ कमी असल्याने भाजप सरकार पाडण्यात यशस्वी ठरले, मात्र राजस्थानमध्ये त्यांना जोरदार धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील सरकार पडण्याचे स्वप्न तर भाजपने सोडूनच द्यावे असा टोला लगावला आहे. जळगावात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे 170 आमदारांचा पाठींबा आहे. आमदार काय बैल जोडी आहे का कोणीही पळवून नेईल? असा खोचक सवालही गुलाबराव पाटील यांनी लगावला. माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे ‘मला कोरोना झाल्यास शासकीय रुग्णालयातच दाखल करा’ असे सांगितल्याचे वृत्त माध्यमातून आले. यावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय रुग्णालयातील उपचार पद्धतीवर विश्वास आहे. शासकीय रुग्णालयात सध्या चांगले उपचार दिले जात असल्याने त्यांनी ती इच्छा व्यक्त केली असेल असा चिमटा गुलाबराव पाटील यांनी काढला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह दिल्लीत पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील कोरोनाची परिस्थिती अमित शहा यांच्या कानावर घालतील, तसंच या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दलही चर्चा होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र प्रत्यक्ष भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Published by:Akshay Shitole
First published:

पुढील बातम्या