शिवसेना नेत्यांच्या मनात भाजपविषयी अजूनही 'सॉफ्ट कॉर्नर'?

शिवसेना नेत्यांच्या मनात भाजपविषयी अजूनही 'सॉफ्ट कॉर्नर'?

शिवसेनेच्या मनात भाजपविषयी अजूनही 'सॉफ्ट कॉर्नर' आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

प्रशांत बाग, 13 नोव्हेंबर, नाशिक : सत्तावाटपावरून भाजप-शिवसेना या मित्रपक्षातील तणाव नवीन राजकीय समीकरण समोर आलं आहे. मात्र युतीचं रबर ताणलं जरी गेलं असलं तरी तुटलं नाही, असं चित्र आहे. शिवसेनेचे मावळते मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिक्रियेनंतर शिवसेनेच्या मनात भाजपविषयी अजूनही 'सॉफ्ट कॉर्नर' आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.

'युतीचं रबर ताणलं गेलंय पण तुटलं नाही. मातोश्रीचा आदेश हाच शिवसैनिकांचा DNA आहे. युती तोडण्याचं कोणतंही पाऊल शिवसेनेचं नाही. आमच्या मित्रपक्षातील नेत्यांशी आजही मैत्रीपूर्ण वैयक्तिक संबंध आहेत. हिंदुत्व हा आमचा धागा आहे. उद्धव ठाकरे आणी देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चांगले मित्र,' असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी भाजपविरोधात आक्रमक होणं टाळलं आहे.

'उद्धव ठाकरे यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे. निकाल लागल्यावर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटायला का आले नाही? ठाकरे कुटुंबीय हे वैयक्तीक संबंध जपणारे आहे. मध्यस्थांच्या माध्यमातून चर्चा होत असली तरी निर्णय महत्वाचा,' असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी युतीवर भाष्य केलं आहे.

महाशिवआघाडीच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरू

एकीकडे शिवसेनेचे नेते भाजपवर हल्लाबोल करणं टाळत असले तरीही दुसरीकडे शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू केली आहे. त्यानंतर आज काँग्रेसच्या नेत्यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठकही झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी संभाव्य आघाडीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. 'घाई करू नका. लवकरच निर्णय येईल. चर्चा योग्य दिशेने सुरू झाली आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना आणि काँग्रेसमध्ये झालेल्या आजच्या बैठकीत किमान समान कार्यक्रम काय राहील यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह सुभाष देसाई, अशोक चव्हाण , बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे हे नेते उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर देखील चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या संभाव्य आघाडीच्या उभारणीसाठी हालाचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचा नेमका गेम कुणी केला? पडद्यामागे नेमकं काय घडतंय? पाहा SPECIAL REPORT

Published by: Akshay Shitole
First published: November 13, 2019, 4:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading