Home /News /maharashtra /

आमदार वाचवण्यासाठी भाजपकडून बनाव, गुलाबराव पाटील पुन्हा बरसले

आमदार वाचवण्यासाठी भाजपकडून बनाव, गुलाबराव पाटील पुन्हा बरसले

शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर प्रतिहल्ला केला आहे.

जळगाव, 15 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी या प्रकरणात योग्य तपास करण्यात येत नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. तसंच याच मुद्द्यावरून ठाकरे सरकार अडचणीत येईल, असाही दावा कऱण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर प्रतिहल्ला केला आहे. 'सुशांत आत्महत्या प्रकरणी सरकार पडेल हा भाजपाचा दावा म्हणजे आपले आमदार वाचवण्यासाठी केलेला बनाव आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत,' असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. सुशांत प्रकरणावरून काय म्हणाले फडणवीस? भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुण्यात मराठी पत्रकार संघ कोविड सेंटरच्या उद्घाटनाला उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावर भाष्य केलं. 'देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत प्रकरणात केलेली सीबीआय चौकशीची मागणी आणि त्यानंतर त्यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रभारीपदी झालेली निवड, हा योगायोग आहे,' अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'सुशांत केस आणि माझ्या बिहार नियुक्तीचा संबंध नाही. सुशांत प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांवर राजकीय दबाव आहे. एरवी महाराष्ट्र पोलिसांचं काम चांगलं आहे, पण सुशात केसमध्ये त्यांच्यावर राजकीय दबाव आहे.'
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Shivsena

पुढील बातम्या