आमदार नाराज असल्याची चर्चा, एकनाथ शिंदे म्हणतात...

आमदार नाराज असल्याची चर्चा, एकनाथ शिंदे म्हणतात...

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याची चर्चा आहे.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी घेतलेली उद्धव ठाकरे यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

'शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याची बातमी खोटी आहे. आमचा कोणताही आमदार नाराज नाही. सर्व आमदार पक्षासोबत आहेत,' असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असताना शिवसेनेची कोंडी झाली आहे. आधी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपची साथ सोडलेली असताना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अजूनही सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. अशातच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं भाजपविरुद्ध निर्णायक लढाई छेडली. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सलगी केली आहे. मात्र शिवसेनेतील 17 आमदार पक्षाच्या या निर्णयावर नाराज असल्याची माहिती आहे. शिवसेनेनं हिंदुत्त्वाचा मुद्दा सोडण्यावरून या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं कळतंय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी या नाराज आमदारांना घेऊन मातोश्रीवर दाखल झाले आहेत. सध्या या नाराज आमदारांची समजूत काढण्यात येत असल्याची माहिती आहे.

नाराज आमदार पश्चिम महाराष्ट्रातील?

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यावरून मतभेद असलेले शिवसेनेचे आमदार हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातील आहेत. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा पट्टा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या आमदारांनी स्थानिक समीकरणं लक्षात घेऊन हा विरोध केला आहे का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Loading...

VIDEO : पोशिंद्याला जेसीबीनं चिरडलं, तर दुसरीकडे म्हशीला दिलं जीवदान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2019 05:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...