उद्धव ठाकरेंनी केली होती विखारी टीका, आता शिवसेना त्याच नेत्याचा प्रचार करणार? रावतेंनी दिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंनी केली होती विखारी टीका, आता शिवसेना त्याच नेत्याचा प्रचार करणार? रावतेंनी दिली प्रतिक्रिया

पाटील पितापुत्राच्या भाजप प्रवेशानंतर युतीत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 31 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि ज्येष्ठ नेते यांनी अखेर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे. पण पाटील पितापुत्राच्या भाजप प्रवेशानंतर युतीत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे. याबाबत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रतिक्रिया दिली आहे

लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पद्मसिंह पाटलांवर जोरदार टीका केली होती. याच पद्मसिंह पाटलांचा आता शिवसेना प्रचार करणार का, असा प्रश्न दिवाकर रावतेंना विचारण्यात आल्यावर रावतेंनी याबाबत भाष्य केलं आहे. 'भाजपला त्यांच्या पक्षात कुणाला घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पाटील परिवाराला पहिले तिकीट तर मिळू द्या, त्यानंतर याचा निर्णय घेऊ,' अशी प्रतिक्रिया रावेंनी दिली आहे.

पाटील कुटुंबाचा भाजप प्रवेश

'निर्णय घेण्यासाठी वेळ लागला पण आता निर्णय घ्यावा लागणार आहे. केसला घाबरून किंवा कुठल्या चौकशीला घाबरून हा प्रवेश करत नाही,' असा खुलासा भाजप प्रवेशाची घोषमा करतान राणा जगजितसिंह यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे नातेवाईक आमदार राणा जगजीतसिंह पाटील राष्ट्रवादी सोडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आमदारांचा भाजप प्रवेश, कार्यकर्ते मात्र राष्ट्रवादीतच

राणा पाटील हे राष्ट्रवादीचे उस्मानाबाद जिल्ह्याचे अध्यक्षदेखील होते. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या कार्यक्रमाकडे जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे राणा पाटील यांच्या भाजपप्रवेशापासून राष्ट्रावादीचा मोठा वर्ग दूर राहिल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे.

दरम्यान, 'मला तुमच्याशी काही बोलायचं आहे,' असं म्हणत राणा पाटील यांनी उस्मानाबादमध्ये पोस्टर्सही लावले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधत राणा पाटील आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करतील, हे आधीच नक्की झालं होतं.

कोल्हापुरात भररस्त्यावर दोन महिलांचा फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: August 31, 2019, 3:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading