Home /News /maharashtra /

चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील एकाच मंचावर, अनेकांच्या उंचावल्या भूवया

चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील एकाच मंचावर, अनेकांच्या उंचावल्या भूवया

चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांचा हात हातात घेऊन तो उंचावत 'भारत माता की जय' अशी घोषणाही दिली.

    औरंगाबाद,26 जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने औरंगाबादेत एक वेगळेच राजकीय चित्र पाहायला मिळाले. ते म्हणजे, एका कार्यक्रमात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील एकाच मंचावर दिसले. एरव्ही एकमेकांवर घणाघाती टीका करणारे चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील एकाच मंचवर आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. एवढेच नाही तर खैरे यांनी जलील यांचा हात हातात घेऊन तो उंचावत 'भारत माता की जय' अशी घोषणाही दिली. दरम्यान, यापूर्वी खासदारांच्या खुर्चीवर बसण्यावरुन, शेजारी-शेजारी बसण्यावरुन खैरे आणि जलील यांच्यात वाद झाला होता. मात्र, आज चक्क दोघेही हातात हात घालून एकाच कार्यक्रमात दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. चंद्रकांत खैरेंचे 'माता-पिता' पूजन प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने 'माता-पिता' पूजनाच्या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते कार्यक्रमाला जमलेल्या जवळपास 1100 माता-पित्यांचे पूजन करण्यात आले. खासदार जलील यांच्या 'तिरंगा रॅलीत' RTI कार्यकर्त्यावर हल्ला औरंगाबाद, 26 जानेवारी: एमआयमचे खासदार इम्जियाज जलील यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या तिरंगा रॅलीत एका माहिती अधिकार कार्यकर्त्यावर (RTI) जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. नदीम राणा असे या माहिती अधिकार कार्यकर्त्याचं नाव आहे. खासदार जलील यांच्या कार्यकर्त्यांनी नदीम यांच्या गाडीवर हल्ला केला. यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. इम्तियाज जलील यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका.. खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात नदीम राणा यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप नदीम राणा यांनी केला आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Aurangabad, Imtiyaz jaleel, Marathwada, MIM, Shiv sena

    पुढील बातम्या