राष्ट्रवादीची कोकणात मोठी खेळी, शिवसेना मंत्र्याला धक्का

राष्ट्रवादीची कोकणात मोठी खेळी, शिवसेना मंत्र्याला धक्का

शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीने नवी खेळी खेळली आहे.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 27 सप्टेंबर : ईडी प्रकरणावरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने कोकणात शिवसेनेला धक्का दिला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीने नवी खेळी खेळली आहे.

सावंतवाडीचे नगराध्यक्ष आणि दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक बबन साळगावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत साळगावकर यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. बबन साळगावकर हे आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशीही माहिती आहे. कट्टर समर्थक आव्हान देण्याच्या तयारीत असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर केसरकर यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.

शरद पवारांच्या खेळीनंतर बदललं राजकीय समीकरण, भाजपसमोर नवं आव्हान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा सत्ता काबीज करणं भाजपसाठी सोपं असल्याचा दावा करण्यात येत होता. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं ईडी प्रकरणात नाव आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर मवाळ भूमिका न घेता फ्रंटफूटवर खेळणं पवारांनी पसंत केलं. त्यामुळे भाजपसमोर नवं आव्हान निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवारांच्या ईडी प्रकरणात काँग्रेस, वंचित आघाडी आणि मनसेसह भाजपचा मित्रपक्ष असलेली शिवसेनाही पवारांच्या बाजूने मैदानात उतरली. त्यामुळे भाजपची अधिकच अडचण झाली आहे. एकीकडे शरद पवारांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असताना मित्रपक्ष शिवसेनेनंही पवारांची पाठराखण केली असल्याने भाजप एकाकी पडली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला.

पोलिसांच्या विनंतीनंतर पवारांनी बदलला निर्णय

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समोर येत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.

शरद पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शरद पवार जर आज ईडी कार्यालयात गेले तर मुंबईत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकतो, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे आता शरद पवारांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला.

VIDEO: '...तर आम्ही सहन करणार नाही', पवारांच्या मुद्द्यावरुन धनंजय मुंडे आक्रमक

Published by: Akshay Shitole
First published: September 27, 2019, 3:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading