मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्याचे प्रश्न सोडून ते तिकडं रेडे...; अरविंद सावंत शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर बरसले

राज्याचे प्रश्न सोडून ते तिकडं रेडे...; अरविंद सावंत शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर बरसले

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई :  आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुवाहाटीला जाऊन पुन्हा एकदा कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे. मात्र यावरून आता आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.  शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत चांगलेच बरसले आहेत. त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हटलं अरविंद सावंत यांनी? 

अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.  राज्याचे प्रश्न सोडून शिंदे गटातील आमदार आणि मंत्री, मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी त्यांना वेळ नाही, त्यामुळे ते त्या ठिकाणी रेडा कापायला गेले असतील त्यांना जाऊद्या, अशी टीका सावंत यांनी केली आहे. तसेच स्वत:चा वेळ त्यांच्या मागे वाया घालू नका असा सल्लाही त्यांनी यावेळी माध्यमांना दिला आहे.

हेही वाचा :  हे माता कामाख्या देवी.. गुवाहाटी दौऱ्यावरुन रोहित पवारांचा शिंदे गटावर जोरदार निशाणा

रोहित पवारांचा निशाणा 

दुसरीकडे शिंदे गटाच्या या दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील उपरोधिक टोला लगावला आहे. 'हे माता कामाख्या देवी.. राज्यातील सामान्य माणसांच्यावतीने तुला प्रार्थना! सत्ता'बदला'साठी तू आशिर्वाद दिला पण आता बदल्याची भाषा थांबावी.. राज्याचे उद्योग गुजरातने पळवू नये.. युवांच्या नोकरीचा घास हिरावला जाऊ नये.. महाराष्ट्राची बदनामी सहन करू नये.. वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावं', असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Uddhav Thackeray