• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • आपुल्या घरात हाल सोसणार नाही मराठी! 'ठाकरे सरकार'ची मराठी भाषेबद्दल मोठी घोषणा

आपुल्या घरात हाल सोसणार नाही मराठी! 'ठाकरे सरकार'ची मराठी भाषेबद्दल मोठी घोषणा

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठीची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटना करत होत्या.

 • Share this:
  उदय जाधव, मुंबई, 12 फेब्रुवारी : राज्यातील सर्व विभागांच्या शाळांमध्ये पहिले ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भात आगामी अधिवेशनात विधेयक आणणार अशी घोषणा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. यामध्ये सर्व विभागांचा सहभाग असेल, असंही सुभाष देसाई म्हणाले. महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठीची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटना करत होत्या. आता अखेर याबाबत राज्य सरकारमधील मंत्र्यानेच घोषणा केली आहे. 'मराठी भाषेचा प्रसार आणि वापर अधिक व्हावा हा यामागचा हेतू आहे,' अशी भूमिका सुभाष देसाई यांनी मांडली. महाविद्यालयांमध्ये 19 फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत अनिवार्य होणार, उदय सामंत यांची घोषणा दरम्यान, मराठी भाषा सर्व माध्यमांच्या शाळेत सक्तीचा कायदा लवकरच लागू होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच दिली आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पत्रावर उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला होता. दिनांक 20 जून 2019 रोजी शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने दिलेल्या आदेशानुसार मराठी भाषा महाराष्ट्रातील सर्व शाळेत बंधनकारक करण्याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद प्रश्न मांडला होता. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री यांनी कायदा करू असे आश्वासन दिले होते. परंतु ते अद्याप अपूर्ण आहे. त्यानंतर आता सुभाष देसाईंनी केलेली घोषणा महत्त्वपूर्ण आहे. मराठी भाषा सर्व शाळेत सक्तीने शिकविण्याचा कायदा अंमलात आणला जावा यासाठी गोऱ्हे यांनी तात्काळ बैठक आयोजित करण्याबाबत पत्र दिले होते. यावर मुख्यमंत्री यांनी तात्काळ प्रशासनास कायदा पुढील अधिवेशनात यावा आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्याची सूचना दिली होती.
  Published by:Akshay Shitole
  First published: