सुनील तटकरेंबाबत शिवसेनेच्या अनंत गितेंचा धक्कादायक दावा

सुनील तटकरेंबाबत शिवसेनेच्या अनंत गितेंचा धक्कादायक दावा

अनंत गीते यांच्या या दाव्याने गुहागरमधील राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजल्याची पाहायला मिळत आहे.

  • Share this:

गुहागर, 17 ऑक्टोबर : शिवसेना नेते अनंत गिते यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. खासदार सुनील तटकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेत घेण्यासाठी अनेकदा विनंती केली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री अनंत गीते यांनी केला आहे.

'एकवेळ मला पक्षात घेतलं नाही तरी चालेल, पण माझी मुलगी अदितीला पक्षात घेऊन उमेदवारी द्या, अशी विनंती सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती,' असा दावा अनंत गीते यांनी गुहागरमधील प्रचार सभेच्या दरम्यान केला आहे. गीते यांच्या या दाव्याने गुहागरमधील राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजल्याची पाहायला मिळत आहे.

सुनील तटकरेंच्या शिवसेना प्रवेशाची झाली होती चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुनील तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र स्वत: सुनील तटकरेंना या सर्व चर्चा फेटाळून लावत आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर या चर्चांना पूर्ण विराम मिळाला.

'माझ्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्य खोट्या आहेत. मी राष्ट्रवादी सोडणार नाही. यापुढेही मी कायम शरद पवार यांच्यासोबत राहणार आहे,' असं म्हणत सुनिल तटकरे यांनी शिवसेना प्रवेशाच्या चर्चा निरर्थक असल्याचं म्हटलं होतं.

शिवसेना आणि सुनील तटकरे

सुनील तटकरे यांनी प्रवेश केल्यास कोकणात शिवसेनेला मोठा फायदा होणार, हे उघड आहे. कारण रायगड जिल्ह्यात तटकरेंचा चांगला प्रभाव आहे. यातूनच तटकरेंच्या प्रवेशाने शिवसेना कोकणात अधिक मजबूत होईल. हाच हेतू समोर ठेवून शिवसेनेच्या नेतृत्वाने सुनील तटकरे यांच्याशी संपर्क केल्याचं बोललं जात होतं. मात्र नंतरच्या काळात या चर्चांना पूर्णविराम दिला आणि आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं.

VIDEO : 'देवेंद्र फडणवीस ठरवणार उपमुख्यमंत्री', पाहा काय म्हणाले अमित शाह

First published: October 17, 2019, 6:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading