मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संजय राऊत यांच्या अटकेवर आदित्य ठाकरे अखेर बोलले, ईडीबद्दल म्हणाले...

संजय राऊत यांच्या अटकेवर आदित्य ठाकरे अखेर बोलले, ईडीबद्दल म्हणाले...


संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे, ईडीकडून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे

संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे, ईडीकडून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे

संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे, ईडीकडून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे

  • Published by:  sachin Salve

सिंधुदुर्ग, 01 ऑगस्ट :  पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut ed arrest) यांना ईडीने अटक केली आहे. राज्यभरात शिवसेनेकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही 'शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे' असं म्हणत ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहे. आज सावंतवाडीमध्ये आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा निघणार आहे. चिपी विमानतळावर मोठ्या जल्लोषात आदित्य ठाकरेंचं स्वागत करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला.

संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे, ईडीकडून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या नियोजित दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोणताही वाद नको म्हणून आमदार केसरकर यांच्या घरासमोरुन मिरवणूक नेण्यास शिवसैनिकांना अटकाव करण्यात आला आहे. तर पर्याय म्हणून उद्यान परिसर किंवा चिटणीस नाक्यावरुन मिरवूणक काढा, अशा सुचना वजा आदेश पोलिस खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

(शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टाची पुन्हा नवी तारीख, सुनावणी लांबणीवर!)

तर,  दीपक केसरकर यांच्या घरासमोरून नेण्यास पोलिसांनी विरोध केल्यानंतर शिवसेनेनंतर काँग्रेसने सुद्धा  चांगलीच आक्रमक झाली आहे. पोलीस सत्तेचा दुरुपयोग करत आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे.  दीपक केसरकर सावंतवाडी नसताना हा विरोध कशासाठी?असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर यांनी उपस्थित केला आहे. तर सत्ताधारी पक्ष दडपशाही व झुंडशाहीचा उपयोग करून कार्यकर्त्यांना 149 ची नोटीस देऊन मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केला आहे. आदित्य ठाकरे  सावंतवाडी दाखल झाले असून त्यांच्या रॅलीला दीपक केसरकर यांच्या घराकडून पोलिसांनी विरोध केला आहे.

First published: