अभिजीत बिचुकलेबाबतच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं उत्तर

अभिजीत बिचुकलेबाबतच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं उत्तर

अभिजीत बिचुकले यांनी वरळी विधानसभेच्या निवडणुकीत एण्ट्री घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने या मतदारसंघातून सुरेश माने यांना उमेदवारी दिली. या हाय प्रोफाईल लढतीमुळे वरळीचं राजकीय वातावरण तापलं असतानाच आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी वरळी विधानसभेच्या निवडणुकीत एण्ट्री घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

वरळीतून निवडणूक लढवणाऱ्या अभिजीत बिचुकले यांच्याबद्दल आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'मी कधीही समोरच्या उमेदवारावर बोलत नाही. मी शिवसेना आणि शिवसैनिकाचं काम याच्यावरच बोलतो.'

दरम्यान वरळी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणारे सुरेश माने हे आदित्य ठाकरेंना चांगली लढत देण्याची शक्यता आहे. माने हे बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते. नंतर त्यांनी बहुजन सोशलिस्ट रिपब्लीकन पार्टी हा गट स्थापन केला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत या गटाचा समावेश आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे यांचं पारडं निश्चितच जड असलं तरी त्यांना लढत सोपी करायची नाही असे विरोधी पक्षांचे डावपेच आहेत. त्यामुळे माने यांच्या नावावर एकमत झालं. सचिन अहीर हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मोठा गट हा पक्ष सोडून गेलेले नाही. त्या गटाने ही निवडणूक लढवावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे केली होती. आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. स्थानिक राजकारण आणि मतांची गणित याचा विचार करून सुरेश माने यांचं नाव निश्चित झालं.

वरळीत दलित आणि बहुजन मतांची टक्केवारीही मोठी असल्याने त्याचा फायदा होण्याची शक्यता राष्ट्रवादीला वाटते. त्यातच माने हे राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर लढण्यास तयार झाले. सुरेश मानेंच्या उमेदवारीमुळे आदित्य यांना ही लढत सोपी केली गेली असाही संदेश जाणार नाही असंही राष्ट्रवादीला वाटतं.

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

Published by: Akshay Shitole
First published: October 10, 2019, 3:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading