मुंबई, 4 जानेवारी : राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी आग्रही असलेल्या अब्दुल सत्तार यांना शिवसेनेकडून राज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यामुळे ते नाराज होते. या पार्श्वभूमीवरच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे.
खातेवाटपाचं गुऱ्हाळ
खातेवाटपावरून महाआघाडी सरकारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता होताना दिसत नव्हती. मात्र आता अखेर काँग्रेसला चार वाढीव खाती दिल्यानंतर आज काँग्रेसची यादी दिल्लीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येणं अपेक्षित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची खातेवाटपाबाबत शुक्रवारी रात्री बैठक झाली. राष्ट्रवादीच्या या बैठकीत पक्षाच्या वाट्याला आलेल्या खात्यांच्या वाटणीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही एकत्रित यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर त्याला राज्यपाल यांची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर आज दुपारपर्यंत खातेवाटपाची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
असं असेल उद्धव ठाकरे सरकारचं संभाव्य खातेवाटप
उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन,
अजित पवार (उपमुख्यमंत्री ) : अर्थ आणि नियोजन
एकनाथ शिंदे - नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम
सुभाष देसाई - उद्योग
अनिल परब - मुख्यमंत्री कार्यालय
आदित्य ठाकरे - पर्यावरण
उदय सामंत - परिवहन
बाळासाहेब थोरात- महसूल
अमित देशमुख- शालेय शिक्षण
जितेंद्र आव्हाड- गृहनिर्माण,
नवाब मलिक - कामगार
अनिल देशमुख- गृहमंत्रालय
धनंजय मुंडे - सामाजिक न्याय
जयंत पाटील- जलसंपदा
राजेंद्र शिंगणे- आरोग्य
दिलीप वळसे-पाटील- उत्पादन शुल्क
राजेंद्र शिंगणे - आरोग्य
यशोमती ठाकूर - महिला व बालकल्याण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.