मुंबईत शिवसेनेचं महागाईविरोधात आंदोलन, आदित्य ठाकरेंचाही सहभाग

मुंबईत शिवसेनेचं महागाईविरोधात आंदोलन, आदित्य ठाकरेंचाही सहभाग

वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेनं आज मुंबईत 12 ठिकाणी आंदोलन केलं. आदित्य ठाकरेही आंदोलनात सहभागी झाले होते.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर : शिवसेनेनं आज मुंबईत महागाईविरोधात घोषणाबाजी आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरच्या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या भरमसाठ दरवाढी विरोधात हे आदोलन करण्यात आलं. आंदोलक महिलांनी भाज्यांचे हार गळ्यात घातले होते. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजीही करण्यात आली. लोअर परेलच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं. नीलमताई गोऱ्हे यांनी केलं तर मातोश्रीसमोरच्या महागाईविरोधी आंदोलनाचं नेतृत्व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलं. मुंबईत एकूण 12 ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं.

'नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय', अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारचा निषेध केला. शिवसेना सरकारमध्ये सामील असूनही सत्तेच्या चाव्या भाजपच्या हाती असल्याने आम्हाला हे महागाईविरोधी आंदोलन करावं लागतंय, असं शिवसेनेनं म्हटलंय.

सीएसटी परिसरात खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत यांच्या नेतृत्त्वात आंदोलन झालं. त्यावेळी शिवसेनेने महागाईचा प्रतिकात्मक राक्षसही आणला होता. आंदोलनावेळी अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं.

 

First published: September 23, 2017, 2:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading