Home /News /maharashtra /

Bhandara: शिवसेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या; घरात घुसून चाकुने केले सपासप वार

Bhandara: शिवसेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या; घरात घुसून चाकुने केले सपासप वार

Murder in Bhandara: भंडाऱ्यात एका शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या (shivsena incumbent murder in bhandara) झाल्याची घटना समोर आली आहे.

भंडारा, 27 नोव्हेंबर: अलीकडेच एका भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येनं नाशकात (BJP incumbent murder in nashik) खळबळ उडाली होती. नाशिकमधील भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या झाल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनही केलं आहे. ही संतापजनक घटना ताजी असताना आता भंडाऱ्यात एका शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या (shivsena incumbent murder in bhandara) झाल्याची घटना समोर आली आहे. दिनेश बांते असं हत्या (Dinesh Bante Murder case) झालेल्या शिवसेना  पदाधिकाऱ्याचं नाव असून ते भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला गावातील उपसरपंच देखील आहे. आधीच राज्यात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या होणाऱ्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापत असताना, यामध्ये आणखी एक भर पडली आहे. दवडीपार बेला गावातील उपसरपंच दिनेश बांते यांची काल रात्री दहाच्या सुमारास घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. हेही वाचा-मुंबईत 20 वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद कृत्य; टेरेसवर भयावह अवस्थेत आढळली पीडित आरोपींनी बांते यांच्या घरात घुसून धारदार चाकुने त्यांच्यावर सपासप वार केले आहेत. बांते घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर, मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने बांते यांना रुग्ण वाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. येथे गेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिनेश बांते यांना मृत घोषित केलं आहे. हेही वाचा-नाशिक हादरलं ! भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, घटनेने खळबळ या घटनेची माहिती भंडारा शहर पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. घराशेजारी राहणाऱ्या लोकांसोबत असलेल्या जुन्या भांडणातून सूड उगवण्यासाठी ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास भंडारा शहर पोलीस करत आहेत. मृत दिनेश बांते हे शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि दवडीपार बेला गावचे उपसरपंच होते. बांते यांच्या हत्येनं गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Bhandara Gondiya, Crime news, Murder

पुढील बातम्या