मुंबई, 11 ऑगस्ट: राज्यात (Maharashtra) सत्तेत असलेल्या शिवसेना (Shivsena) पक्षाचं उत्पन्न (Party income) घटल्याची (Decrease) माहिती समोर आली आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)आणि काँग्रेस (Congress) हे तिन्ही पक्ष सत्तेत आहेत. त्यात शिवसेना देखील आहे. मात्र सत्तेत असतानाही शिवसेनेचं उत्पन्न 15.57 टक्क्यांनी घटलं आहे.
शिवसेनेचे उत्पन्न 15.57 टक्क्यांनी घटून ते 2019-2020 या वर्षात 111.40 कोटी रुपयांवर आलं आहे. ज्यावर्षी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळेचं हे पक्षाचं उत्पन्न आहे. 28 नोव्हेंबर 2019 ला उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी म्हणजेच 2018- 2019 यावर्षात शिवसेनेचं उत्पन्न 135.50 कोटी रुपये होते. स्वतः शिवसेनेनं एप्रिल 2021 च्या निवडणूक आयोगानं दिलेल्या आपल्या वार्षिक लेखा अहवालात ही माहिती दिली.
लाथाबुक्क्यांनी मारहाण करत टोळक्यानं घेतला तरुणाचा जीव; पिंपरीतील शहराध्यक्षाला अटक
राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्त्व शिवसेना पक्ष करत आहे. 31 मार्च 2020 संपलेल्या आर्थिक वर्षात शिवसेनेचं उत्पन्न 111.40 कोटी रुपये असल्याचं म्हटलं आहे. या उत्पन्नात शुल्क आणि नोंदणीतून 25.39 लाख रुपये, अनुदान आणि देणग्या तसंच वर्गणीच्या माध्यमातून 105.65 कोटी रुपये आणि अन्य माध्यमांतून 5.50 कोटी रुपये मिळाले होते.
तसंच 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात शिवसेना पक्षाला शुल्क आणि नोंदणीतून 90.42 लाख रुपये, अनुदान, देणग्या आणि वर्गणीच्या माध्यमातून 130.96 कोटी रुपये आणि अन्य माध्यमांतून 3.64 कोटी रुपये मिळाले होते.
दोन वर्षात शिवसेनेला 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या या इलेक्टोरल बाँडमधून मिळाल्या आहेत. 2019-2020 या वर्षात शिवसेनेनं 111.40 कोटी रुपयांच्या दाखवलेल्या आपल्या उत्पन्नात 36.79 टक्के म्हणजे जवळपास 40.98 कोटी रुपयांच्या देणग्या इलेक्टोरल बाँडमधून आल्यात.
...म्हणून दोन महिन्यांपासून पुणे पोलीस स्टेशनमध्ये राहतंय हे बांग्लादेशी जोडपं
2018- 2019 या वर्षात इलेक्टोरल बाँडमधून 44.58 टक्के म्हणजे जवळपास जवळपास 60.40 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे या काळात ऑक्टोबर 2019 मध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षानं 53.27 कोटी रुपये खर्च केल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षानं 24.31 कोटी रुपये खर्च केले.
याव्यतिरिक्त 2019- 2020 यावर्षात पक्षानं जाहिरातीवर 3.14 कोटी रुपये खर्च केलेत. आपल्या वार्षिक लेखा अहवालात शिवसेनेनं ही माहिती दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.