'अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊ', शहांच्या वक्तव्यावर शिवसेनेचा घणाघात

'अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊ', शहांच्या वक्तव्यावर शिवसेनेचा घणाघात

'येऊ दया अंगावर, होऊ दया सामना , हा महाराष्ट्र तुम्हाला आस्मान दाखवल्या शिवाय राहणार नाही.'

  • Share this:

मुंबई 6 जानेवारी : भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या युतीच्या  वक्तव्यावर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. शहा यांचं वक्तव्य हे मस्तवाल आणि उन्मत्त आहे. अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेण्यास शिवसेना नेहमीच तयार असते. येऊ दया अंगावर, होऊ दया सामना अशी प्रतिक्रिया शिवसेनेने एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे व्यक्त केलीय.

काय आहे शिवसेनेची प्रतिक्रिया?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शाह यांच्या मस्तवाल आणि उन्मत वक्तव्यावरून त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पर्दाफाश झाला आहे , शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यानी देशातील हिंदुंच्या मनातील भावना मांडली आणि हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फीर सरकार असा नारा दिला तो झोंबल्या मुळेच आणि शिवसेनेच्या आसुड ओढण्यामुळेच भाजपच्या पाया खालची जमीन सरकली आणि आता भाजप नेत्यांच्या जीभा ही सरकू लागल्या , एकंदर चांगलेच झाले , भाजपला हिंदुत्व मानणारे नको असेच दिसते आहे.

5 राज्यांच्या निकलानंतर तसेही भाजपचे अवसान गळले आहेच , भारतीय जनतेने त्याना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केली आहेच , लोकसभेच्या महाराष्ट्रात 40 जागा जिंकण्याची वल्गना करुन भाजपने आपली इ व्ही एम् शी युती होणार हे जहीर केलेच आहे , तसेही त्यांच्या अनील गोटे नावाच्या आमदाराने धुळे महानगर पालिकेत यांचे भांडे फोडलेच आहे , आता होऊंन जाऊद्या , शिवसेना तसेही अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार असतेच , येऊ दया अंगावर, होऊ दया सामना , हा महाराष्ट्र तुम्हाला आस्मान दाखवल्या शिवाय राहणार नाही "

काय म्हणाले होते अमित शहा?

  • युती होईल की नाही त्या विचार करू नका. प्रत्येक बूथ जिंकण्याचा प्रयत्न करा. युती झाली नाही तरीही हरकत नाही एक एकाला उखडून फेकू.
  • 2019 ची तिसरी पानिपतची लढाई आपण हरलो तर इतिहास बदलेल. 2019 काहीही करून जिंकायची आहे...कारण मोदी आपले नेतृत्व करत आहेत.
  • राहुल गांधींनी आपल्या खानदानाचा इतिहास बघावा त्यानंतर इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करावेत.
  • राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टने चौकशी करण्याची आवश्यकता नाही असं म्हटलं आहे.
  • भाजपने राज्यात आणि केंद्रात एक पैशाचाही भ्रष्टाचार केला नाही. मोदी गरीब कुटुंबातून आले आहेत तरी ते देशाच्या उच्च पदावर पोहचले आहेत.
  • जलयुक्त शिवार मुळे महाराष्ट्रातील पाण्याची पातळी वाढली. हे देवेंद्र फडणवीस यांचं यश आहे.
  • निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची विचारधारा लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. त्यातुनच निवडणुका जिंकता येतात.
  • जोश मध्ये निवडणूक जिंकता येत नाही तर होश मध्ये निवडणूक लढावी लागते. त्यामुळे कामाला लागा.
  • विरोधकांना हृदय विकाराचे झटके आले पाहिजे असा विजय 2019 मध्ये भाजपला मिळाला पाहिजे.

First published: January 6, 2019, 10:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading