पुणे मनपामध्ये शिवसेनेला सत्तेत वाटा मिळणार? भाजपच्या निर्णयाकडं लक्ष

पुणे मनपामध्ये शिवसेनेला सत्तेत वाटा मिळणार? भाजपच्या निर्णयाकडं लक्ष

युतीनंतर शिवसेनेनं पुणे मनपामध्ये सत्तेचा वाटा मागितला आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • Share this:

पुणे, 4 मार्च : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना - भाजपमध्ये दिलजमाई झाली. त्यानंतर आता शिवसेनेनं पुणे मनपातील सत्तेत देखील वाटा मिळावा अशी मागणी केली आहे. शिवसेनेनं आता उपमहापौरपदासह एक वर्षासाठी स्थायी समिती अध्यक्षपद आणि काही विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची मागणी केली आहे.

2014मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असोत अथवा पालिका निवडणुका यामध्ये देखील दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला होता. मुंबई आणि ठाणे मनपा वगळता पुणे मनपामध्ये भाजपनं विजय मिळवला होता. प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांनी परस्परांवर जोरदार हल्ले देखील चढवले होते. पण, आता दिलजमाई झाल्यानंतर शिवसेनेनं सत्तेत वाट्याची मागणी केली आहे. यावर आता भाजप काय भूमिता घेते हे पाहावं लागणार आहे.

आर्मी शर्ट घालून भाजपच्या मनोज तिवारींचा निवडणूक प्रचार, नेटिझन्सनी केलं ट्रोल

युतीचा फटका भाजपला?

होय नाय करता करता अखेर शिवसेना - भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर युतीची घोषणा झाली. युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित झाला असून लोकसभेसाठी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. पण, खरी गंमत आहे ती विधानसभेच्या निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये.

कारण, 2014 साली भाजपनं स्वबळावर 123 जागा जिंकल्या होत्या. तर, शिवसेनेनं 63 जागा. पण, युतीच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना आणि भाजप अनुक्रमे 143 आणि 145 जागा लढवणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थात भाजपपुढील संकट वाढणार आहे. युतीच्या जागा वाटपच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपला केवळ 22 जागा जास्त लढवायला मिळणार आहे. तर, शिवसेनेला मात्र 80 जागा जास्तीच्या मिळणार आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अधिक बंडखोरी होण्याची शक्यता आहे. या डॅमेज कंट्रोरला रोखण्यासाठी भाजपकडून आत्तापासूनच प्रयत्न केले जात आहे.

VIDEO: 'नाणार'वर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले...

First published: March 4, 2019, 10:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading