शिवसेनेच्या मंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही? PHOTO व्हायरल

शिवसेनेच्या मंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही? PHOTO व्हायरल

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काल संध्याकाळी एक आढावा बैठकीतील हा फोटो असल्याचा दावा करण्यात येत आहे.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 30 ऑगस्ट : सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचा एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. सावंतवाडी विश्रामगृहावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काल संध्याकाळी एक आढावा बैठकीतील हा फोटो असल्याचा दावा करण्यात येत आहे.

दीपक केसरकर हे बैठकीत बोलत असताना जिल्हाधिकारी पांढरपट्टे पाय ताणून बिनधास्त झोप काढत असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या वर्तनावर सिंधुदुर्गात जोरदार टीका होत आहे. तसंच जिह्यात हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

बैठकीतच झोप घेत असलेला जिल्ह्याधिकाऱ्यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर हेदेखील अडचणीत आले आहेत. पालकमंत्री असलेल्या केसरकरांचा प्रशासनावर जराही वचक उरला नाही का, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी आता या फोटोवरून दीपक केसरकर यांना विरोधकांकडून आणखी लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोकणातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. कोकणातील राणे विरुद्ध शिवसेना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राणेंचा भाजप प्रवेश होत असल्याने याचा युतीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीआधी कोकणात रंजक घडामोडी घडू शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत तरुणांची घोषणाबाजी, पाहा हा VIDEO

First published: August 30, 2019, 12:15 PM IST
Tags: shivsena

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading