मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : शिवसेनेचा तिसरा टीझर प्रदर्शित, आम्ही त्याच लढाईची वाट पाहत आहोत म्हणत ठाकरेंची सिंहगर्जना...

Dasara Melava : शिवसेनेचा तिसरा टीझर प्रदर्शित, आम्ही त्याच लढाईची वाट पाहत आहोत म्हणत ठाकरेंची सिंहगर्जना...

शिवसेनेचा हा ऐतिहासिक दसरा मेळावा 5 ऑक्टोबरला सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावर होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 3 ऑक्टोबर : शिवसेनेचा दसरा मेळावा येत्या 5 ऑक्टोबरला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट या दोघांचा वेगवेगळा मेळावा होत आहे. यानिमित्ताने राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात होणार आहे. यातच आतच शिवसेनेने आपला तिसरा टिझर प्रदर्शित केला आहे.

शिवसेनेचा तिसरा टिझर प्रदर्शित -

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने याआधी शिवसेनेचा दोन टिझर प्रदर्शित झाले आहेत. मात्र, आता तिसरा टिझर प्रदर्शित झाला आहे. शिवसेनेच्या सोशल मिडिया हँडलवर हाल टिझर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सिंहगर्जना करत शिवसैनिकांना आवाहन केले आहे.

हेही वाचा - Dasara Melava : शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बदलेला 'भगवा', मैदानात दिसणार वेगळा झेंडा!

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन -

शिवसेनेने प्रदर्शित केलेल्या या तिसऱ्या टिझरमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे. ते म्हणाले, तमाम माझ्या शिवसेनिकांना, शिवसेना प्रेमींना दसरा मेळाव्याला येणाऱ्या, उत्साहात या, वाजत गाजत, गुलाल उधळत या पण शिस्तीत या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या टिझरमध्ये उद्धव ठाकरेंच्या भाषणाचाही अंश दाखवण्यात आला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मर्द असतो तो याच लढाईची वाट पाहत असतो, आणि आम्ही याच लढाईची वाट पाहत आहोत, या शब्दात त्यांनी सिंहगर्जना केली. शिवसेनेचा हा ऐतिहासिक दसरा मेळावा 5 ऑक्टोबरला सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावर होणार आहे.

First published:

Tags: Mumbai, Shiv sena dasara melava, Shivsena, Uddhav Thackeray