मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बदलेला 'भगवा', मैदानात दिसणार वेगळा झेंडा!

Dasara Melava : शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बदलेला 'भगवा', मैदानात दिसणार वेगळा झेंडा!


अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील,'

अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील,'

शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्याआधी महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्यामुळे आता मुंबईत ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा दसरा मेळावा होईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 सप्टेंबर : शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्याआधी महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्यामुळे आता मुंबईत ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा दसरा मेळावा होईल. या मेळाव्याची दोन्ही गटांकडून जोरदार तयारी केली जात आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात होणार आहे.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात भगव्या झेंड्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत माहिती दिली. शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी झेंड्याचा रंग भगवाच असेल, पण त्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो असणार आहेत. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी एक लाख झेंडे बनवण्यात आले आहेत, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.

दोन्ही दसरा मेळावे जवळपास आहेत, त्यामुळे आपले कार्यकर्ते कोण आणि दुसऱ्यांचे कोण हे ओळखता यावं, म्हणून भगव्या झेंड्यामध्ये थोडे बदल केल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.

एक नेता…एक पक्ष…एक विचार…एक लव्य…एक नाथ, शिंदेंच्या दसरा मेळाव्याचा पहिला टिझर

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची तयारी

5 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता वांद्र्याच्या बीकेसी मैदानामध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरूवात होणार आहे. दसरा मेळावा उत्साहात साजरा करायचा आहे. त्यासाठी साधारणत: अडीच ते तीन लाख लोक येण्याची शक्यता आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते.

'दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या गाड्यांसाठी दहा मैदानं बूक केली आहेत. अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील,' असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला.

'दसरा मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते येतील त्यांच्या जेवणाची, पाण्याची आणि वॉशरूमची व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते आपल्यासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,' अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना दिल्या आहेत.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena