अजित पवारांवर शिवसेनेकडून जबरी टीका, म्हणाले 'दादा कुछ तो गडबड है'

अजित पवारांवर शिवसेनेकडून जबरी टीका, म्हणाले 'दादा कुछ तो गडबड है'

अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी हुंदका आवरत जे स्पष्टीकरण दिलं. त्यानंतरही प्रश्नं निर्माण होतो तो म्हणजे, मोठ्या पवारांचा ईडीसोबत संघर्ष सुरू असताना अजित दादा कुठेच दिसले नाहीत.

  • Share this:

मुंबई, 30 सप्टेंबर : 'लोकांच्या मनात अनेक प्रश्नं आहेत...ते पाहिल्यावर वाटते "दादा कुछ तो गडबड है." असा प्रश्नं सामनाच्या अग्रलेखातून आज विचारण्यात आला आहे. ईडी विरुद्ध शरद पवार असा सामना रंगलेला असतानाच पुतणे अज्त पवार यांनी अचानाक राजीनामा देत नाट्य सुरू करून मोठ्या पवारांनी निर्माण केलेलं रंगतदार नाटक पार पडलं अशी घणाघाती टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी हुंदका आवरत जे स्पष्टीकरण दिलं. त्यानंतरही प्रश्नं निर्माण होतो तो म्हणजे, मोठ्या पवारांचा ईडीसोबत संघर्ष सुरू असताना अजित दादा कुठेच दिसले नाहीत. त्यामुळेच "दादा कुछ तो गडबड है". असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

काय लिहलं आहे सामनाच्या अग्रलेखात

शिवसेना-भाजप युतीचं या चार जागांवर अडलं घोडं, तोडगा निघताच होणार घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली तरी शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून अजून वाटाघाटी सुरूच आहे. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक संपली आहे. शिवसेनेने केलेली 126 जागांची मागणी भाजपने फेटाळली आहे. शिवसेनेला 124 जागा देण्याची तयारी भाजपने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने 126 जागांची मागणी फेटाळल्यानंतर आता शिवसेना काय भूमिका घेते, याकडे संगळ्यांचे लक्ष लागले आहेत.

चार जागांवर युतीचं अडलं घोडं..

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळी (वर्धा), सावनेर (नागपूर), माण- खटाव (सातारा) आणि बेलापूर (नवी मुंबई) या चार जागांवर युतीचं घोडं अडलं आहे. दोन्ही पक्षांमध्ये अद्याप वाटाघाटी सुरूच आहे. आता अंतिम टप्प्यात चर्चा सुरू असून तोडगा निघताच युतीची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या युतीची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विधानसभेसाठी भाजप पहिली यादी आज येणार, उमेदवारांची नावं निश्चित!

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झाली. जवळपास साडेचार तास चाललेल्या बैठकीमध्ये विधानसभा उमेदवारांच्या नावावरती अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जवळपास एक तास बैठक झाली. त्यानंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचीदेखील जवळपास एक तास बैठक झाली. साडेसहा तासाच्या मंथनानंतर भाजपची पहिली यादी आज येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यावेळी विधानसभा रणांगणात उतरणार आहेत तर शिवसेना-भाजप युतीवरदेखील अंतिम निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीमध्ये युतीच्या फार्म्युल्यावरदेखील निर्णय घेण्यात आला असून शिवसेनाला 124 जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.

काँग्रेसने रविवारी 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आता कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने 90 टक्के उमेदवारांची नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे. तर युतीमुळे काही जागांचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. दरम्यान, ज्या उमेदवारांनी गेल्या 5  वर्षात पक्षासाठी कामं केली नाही अशा 20 टक्के नेत्यांना भाजपकडून नारळ देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून अनेक दिग्गज नेत्यांची जोरदार इनकमिंग झाली. त्यामुळे भाजपने जर आयात नेत्यांना उमेदवारी दिली तर भाजपमध्ये अनेकांमध्ये नाराजीचा सूर दिसू शकतो. अशा वेळी आता भाजप काय खेळी खेळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 30, 2019, 7:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading