मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदेंचा पुढचा 'बाण', ठाकरे होणार घायाळ? प्रतिज्ञापत्रासह निवडणूक आयोगाला दिले पुरावे!

शिंदेंचा पुढचा 'बाण', ठाकरे होणार घायाळ? प्रतिज्ञापत्रासह निवडणूक आयोगाला दिले पुरावे!

फाईल फोटो

फाईल फोटो

शिवसेना कुणाची ही ठाकरे आणि शिंदे यांच्यातली लढाई आता पुढच्या टप्प्यात पोहोचली आहे. शिवसेना आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाचा वाद सध्या निवडणूक आयोगाकडे आहे. या वादात आता एकनाथ शिंदे यांच्याकडून पुढचं पाऊल टाकण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 6 ऑक्टोबर : शिवसेना कुणाची ही ठाकरे आणि शिंदे यांच्यातली लढाई आता पुढच्या टप्प्यात पोहोचली आहे. शिवसेना आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाचा वाद सध्या निवडणूक आयोगाकडे आहे. या वादात आता एकनाथ शिंदे यांच्याकडून पुढचं पाऊल टाकण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे, त्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मिळावं, तसंच ठाकरे गट धनुष्यबाण या चिन्हाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात केला आहे.

निवडणूक आयोगात दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीच्या कागदपत्रांवर एकनाथ शिंदे यांच्या वकिलांच्या टीमच्या सह्या आहेत. मुख्य म्हणजे एकनाथ शिंदेंच्या वकिलांच्या टीममध्ये ठाकरे कुटुंबातले निहार ठाकरे यांचाही समावेश आहे.

एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला एक प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. तसंच निवडणूक आयोगाला केलेल्या अर्जामध्ये त्यांनी शिवसेनेचं चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाच्या वादाची सुनावणी तातडीने घ्यावी, अशी मागणीही केली आहे.

निवडणूक आयोगाने सांगितल्यानंतर आम्ही 8 ऑगस्टपर्यंत 31,342 प्रतिज्ञापत्र दाखल केली, यामध्ये 19 पैकी 12 खासदारांचा समावेश आहे. हे 12 खासदार जवळपास 69,18,571 लोकसंख्येचे प्रतिनिधी आहेत. याशिवाय 55 पैकी 40 आमदार 36,57,327 लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करतात आणि 31,291 प्राथमिक सदस्यांचं प्रतिज्ञापत्रही निवडणूक आयोगाला देण्यात आलं आहे, असं एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाला दिलेल्या या अर्जामध्ये म्हणलं आहे.

ठाकरे गटाकडून मात्र कागदपत्र सादर करण्याऐवजी वेळ वाढवून मागण्यात आली. 23 ऑगस्टला आमच्याकडून जवळपास 1,20,192 शिवसेना पक्षाचे प्राथमिक सदस्य आणि 144 पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र देण्यात आली. ठाकरे गटाला पक्षातून आणि लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा नसल्यामुळे त्यांच्याकडून कागदपत्र सादर करायला आणखी 2 आठवड्यांची वेळ मागून घेण्यात आली आहे, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी या अर्जात केला आहे. 23 सप्टेंबरला 11 राज्य प्रभाऱ्यांचं प्रतिज्ञापत्रही आपण आयोगाला सादर केल्याचं शिंदेंनी या पत्रात नमूद केलं आहे.

आम्ही 1,50,000 पेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत, हा शिवसेना पक्षाच्या सदस्यांचा आम्हाला असलेल्या पाठिंब्याचा पुरावा आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना सदस्यांचा पाठिंबा असल्याचं एकही पत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेलं नाही. आम्ही प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन प्रस्ताव मंजूर करून घेतले, पण ठाकरे गटाकडून अशा बैठका झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असंही शिंदेंनी त्यांच्या या अर्जात म्हणलं आहे. शिंदेंकडून 4 ऑक्टोबरला हा अर्ज आणि प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav Thackeray