मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भर रस्त्यात शिवीगाळ करत भिडले दोन नेते आणि...

शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भर रस्त्यात शिवीगाळ करत भिडले दोन नेते आणि...

भर रस्त्यात नगरसेवक आणि माजी विभाग प्रमुख एकमेकांशी भिडले. इतकंच नाही दोघांमध्ये धराधरी झाली आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरू होती. या घटनेमुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

भर रस्त्यात नगरसेवक आणि माजी विभाग प्रमुख एकमेकांशी भिडले. इतकंच नाही दोघांमध्ये धराधरी झाली आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरू होती. या घटनेमुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

भर रस्त्यात नगरसेवक आणि माजी विभाग प्रमुख एकमेकांशी भिडले. इतकंच नाही दोघांमध्ये धराधरी झाली आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरू होती. या घटनेमुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

नाशिक, 22 ऑगस्ट : राज्यात आधीच कोरोनाचं संकट असताना राजकीय वातावरण तापलं आहे. अशात आता शिवसेनेच्या गोटातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भर रस्त्यात नगरसेवक आणि माजी विभाग प्रमुख एकमेकांशी भिडले. इतकंच नाही दोघांमध्ये धराधरी झाली आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरू होती. या घटनेमुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

सेना नगरसेवक आणि माजी विभाग प्रमुख यांची भर रस्त्यात एकमेकांशी जुंपली. सेना नगरसेवक भागवत आरोटे आणि सुधाकर जाधव यांच्यात धराधरी झाली. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ झाली. या दरम्यान, सगळ्यात धक्कादायक म्हणजे नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्या समोर ही घटना घडली. महापौर यांचे सुरक्षारक्षक यांनी बळजबरीनं दोघांना बाजूला केलं.

तुमच्या बँक खात्यावर आहे हॅकर्सची नजर, फसवणूक टाळण्यासाठी वाचा SBIच्या सूचना

मिळालेल्या माहितीनुसार, महापौरांचा सिडको भागात दौरा सुरू होता. घटना घडली तेव्हा ते खुटवड नगर भागातील समस्यांची पाहणी करत होते. अशात नागरिकांशी चर्चा करताना खर्चीक रकमेवरून वाद पेटला तो थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. यानंतर या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे तर अंबड पोलीस स्टेशन पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गणरायाचं घरोघरी उत्साहात स्वागत, कोरोनाचं विघ्न दूर करण्यासाठी भाविकांचं साकडं

मिळालेल्या माहितीनुसार, भर नागरिकांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांमध्ये असा वाद पेटल्यामुळे नागरिकांपासून ते इतर राजकीय पक्षांपर्यंत चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

खरंतर, कोरोनामुळे राज्यात आधीच सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे. अशात हा वाद म्हणजे विरोधी पक्षाला आयत कोलीत दिल्यासारखं आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Lockdown, Shivsena