महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या राज्यपाल भेटीबद्दल निर्माण झाला सस्पेन्स

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या राज्यपाल भेटीबद्दल निर्माण झाला सस्पेन्स

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अखेर सहमती दर्शवली असून लवकरच या अनोख्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई, 21 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला महिना पूर्ण होत आल्यानंतर सत्तासंघर्ष अंतिम टप्प्यात आला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अखेर सहमती दर्शवली असून लवकरच या अनोख्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे नेते शनिवारी महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेण्याची चर्चा होती. मात्र आता ही भेट पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे 22 आणि 23 नोव्हेंबरला दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे एका कॉन्फरन्ससाठी जाणार आहेत. तर 24 तारखेला सायंकाळी ते मुंबईत येणार आहेत, अशी माहिती राजभवनाकडून दिली गेली आहे. राज्यपाल दिल्लीतून परतल्यानंतर पुढील हालचाली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता कमी आहे.

विधीमंडळात कोण करणार काँग्रेसचं नेतृत्व? उद्या होणार अंतिम निर्णय

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत असल्याने काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची उद्या 4 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. काँग्रेसचा विधीमंडळ गटनेता निवडण्यासाठी ही बैठक होणार आहे. सर्व आमदारांना उद्या बैठकीसाठी मुंबईत हजर राहण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत.

दुसरीकडे, उद्या सकाळी 9 वाजता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची संयुक्त बैठक मुंबईत बोलावण्यात आली आहे. आजच्या दिल्लीतल्या बैठकीतच सत्ता वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होण्याची शक्यता आहे. उद्या मुंबईतल्या बैठकीला केवळ राज्यातले नेते उपस्थित असतील. त्यानंतर मुंबईतच महाविकास आघाडीबाबतची अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती आहे.

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मोदी आणि पवारांच्या भेटीत काय घडलं? पाहा VIDEO

First published: November 21, 2019, 4:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या