बिनखात्याच्या मंत्र्यांची होणार कॅबिनेट बैठक, अद्याप सर्व खाती उद्धव ठाकरेंकडेच!

बिनखात्याच्या मंत्र्यांची होणार कॅबिनेट बैठक, अद्याप सर्व खाती उद्धव ठाकरेंकडेच!

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूरही उमटू लागला आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई, 11 डिसेंबर : महाविकास आघाडीचा शपथविधी होऊन आज 14 दिवस झाले तरीही कॅबिनेट मंत्र्यांची अवस्था बिनखात्याचे मंत्री अशी आहे. मंत्रालयात आज दुपारी कॅबिनेट बैठक होणार आहे. या बैठकीला बिनखात्याचे कॅबिनेट मंत्री उपस्थित राहतील. कारण सर्व खाती अजूनही स्वतः उद्धव ठाकरे हाताळत आहेत. याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूरही उमटू लागला आहे.

कॅबिनेट खात्यांचे वाटप काल रात्री उशिरा जाहीर केले जाणार होते. मात्र ते केले गेलेच नाही. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात खातेवाटपाबाबत तोडगा निघाला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात खातेवाटपातील गाडी पुढे जात नसल्याचं म्हटलं जात आहे. किमान आज तरी कॅबिनेट खात्याच्या मंत्र्यांना कॅबिनेट बैठकीपर्यंत खातेवाटप जाहीर होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपची बैठक का टाळली? अखेर पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून काँग्रेस हायकमांडने शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे. या मुद्द्याचे पडसाद आजच्या कॅबिनेट बैठकीत उमटतात का, हे पाहावं लागेल. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र दुसरीकडे राज्यातले काँग्रेस नेते मात्र शिवसेनेला सावरून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे दिल्ली आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये देखील वेगवेगळी भूमिका दिसत आहे.

काँग्रेस हायकमांडचा शिवसेनेला इशारा

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली आहेत. शिवसेनेने लोकसभेत मात्र विधेयकाचं समर्थन केलं. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींसह वरिष्ठ काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेनं आपला निर्णय मागे घेतला नाही तर महाराष्ट्रील सत्ता स्थापनेचा पाठिंबा काढून घेऊ अशी धमकीही काँग्रेसने दिल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 09:58 AM IST

ताज्या बातम्या