मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पालकमंत्री आणि खातेवाटपाची यादी तयार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार घोषणा

पालकमंत्री आणि खातेवाटपाची यादी तयार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार घोषणा

सत्ताधारी पक्षांनी आपल्या वाट्याला आलेली खाती आणि पालकमंत्र्यांची यादी तयार केली आहे.

सत्ताधारी पक्षांनी आपल्या वाट्याला आलेली खाती आणि पालकमंत्र्यांची यादी तयार केली आहे.

सत्ताधारी पक्षांनी आपल्या वाट्याला आलेली खाती आणि पालकमंत्र्यांची यादी तयार केली आहे.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 3 जानेवारी : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये खातेवाटपावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं. आता याबाबत तोडगा निघाला असून तिन्ही पक्षांनी आपल्या वाट्याला आलेली खाती आणि पालकमंत्र्यांची यादी तयार केली आहे. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करणार आहेत.

खातेवाटपाबाबत गुरुवारी तिन्ही पक्षांची मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी, 'आमचे छोटे प्रश्न हे संपले असून मुख्यमंत्र्यांकडे यादी दिली आहे', असा खुलासा केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही बैठक पुरातन बंगल्यावर पार पडली. तब्बल साडेचार तास ही बैठक सुरू होती. 'काँग्रेसकडून सर्व बाबींवर चर्चा झाली आहे. सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली. काही खाते आणि पालकमंत्री यावरून थोडा वाद होता, पण सुटलेला आहे. आता आम्ही आमचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. यावर कधी निर्णय घ्यायचा ते मुख्यमंत्री जाहीर करतील,' असं या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यावरून भाजपने केला खुलासा, विरोधकांना केला सवाल

बाळासाहेब थोरात यांनीही, 'महाविकासआघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. काही नाराज होते, त्यांची नाराजी दूर झाली आहे. शुक्रवारी खातेवाटपाबद्दल निर्णय जाहीर होईल, असं स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री आणि मंत्री यांची शुक्रवारी घोषणा होईल, अशी माहिती दिली आहे. काँग्रेसबाबतचे काही निर्णय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, 2019 च्या शेवटी म्हणजे 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र खातेवाटपावर एकमत होत नव्हतं. शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्याकडे महत्त्वाची खाती ठेवल्याचं मत काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केलं होतं. लोकांशी थेट संबंधित असलेलं एखादं खातं आपल्याला हवं असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता.

मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्या वाट्याला आलेले विभाग सोडण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे मोजकीच खाती ठेवण्याची शक्यता असून महत्त्वाची खाती ते एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत नगरविकास हे खातं सहसा मुख्यमंत्र्यांकडेच ठेवण्याचा प्रघात होता. मात्र ठाकरे हे खातं एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठेवतील. तर राष्ट्रवादी गृहमंत्रालय अनिल देशमुखांकडे देत सगळ्यांनाच धक्का देण्याची शक्यता आहे. या खातेवाटपातल्या महत्त्वाच्या मंत्र्यांकडे कुठलं खातं असेल याची माहिती न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहे.

असं असेल उद्धव ठाकरे सरकारचं संभाव्य खातेवाटप

उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन,

अजित पवार (उपमुख्यमंत्री ) : अर्थ आणि नियोजन

एकनाथ शिंदे - नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम

सुभाष देसाई - उद्योग

अनिल परब - मुख्यमंत्री कार्यालय

आदित्य ठाकरे - पर्यावरण

उदय सामंत - परिवहन

बाळासाहेब थोरात- महसूल

अमित देशमुख- शालेय शिक्षण

जितेंद्र आव्हाड- गृहनिर्माण,

नवाब मलिक - कामगार

अनिल देशमुख- गृहमंत्रालय

धनंजय मुंडे - सामाजिक न्याय

जयंत पाटील- जलसंपदा

राजेंद्र शिंगणे- आरोग्य

दिलीप वळसे-पाटील- उत्पादन शुल्क

राजेंद्र शिंगणे - आरोग्य

यशोमती ठाकूर - महिला व बालकल्याण

First published:

Tags: Congress, NCP, Shivsena