शरद पवारांच्या खेळीनंतर बदललं राजकीय समीकरण, भाजपसमोर नवं आव्हान

ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर मवाळ भूमिका न घेता फ्रंटफूटवर खेळणं पवारांनी पसंत केलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 02:38 PM IST

शरद पवारांच्या खेळीनंतर बदललं राजकीय समीकरण, भाजपसमोर नवं आव्हान

मुंबई, 27 सप्टेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा सत्ता काबीज करणं भाजपसाठी सोपं असल्याचा दावा करण्यात येत होता. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं ईडी प्रकरणात नाव आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर मवाळ भूमिका न घेता फ्रंटफूटवर खेळणं पवारांनी पसंत केलं. त्यामुळे भाजपसमोर नवं आव्हान निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवारांच्या ईडी प्रकरणात काँग्रेस, वंचित आघाडी आणि मनसेसह भाजपचा मित्रपक्ष असलेली शिवसेनाही पवारांच्या बाजूने मैदानात उतरली. त्यामुळे भाजपची अधिकच अडचण झाली आहे. एकीकडे शरद पवारांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असताना मित्रपक्ष शिवसेनेनंही पवारांची पाठराखण केली असल्याने भाजप एकाकी पडली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला.

पोलिसांच्या विनंतीनंतर पवारांनी बदलला निर्णय

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समोर येत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.

शरद पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शरद पवार जर आज ईडी कार्यालयात गेले तर मुंबईत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकतो, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे आता शरद पवारांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला.

Loading...

VIDEO: '...तर आम्ही सहन करणार नाही', पवारांच्या मुद्द्यावरुन धनंजय मुंडे आक्रमक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 02:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...