मुंबई, 23 जानेवारी: मुंबई मनसेचं आज पहिलं राज्यव्यापी अधिवेशन आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदुत्वाबाबत काय भूमिका स्पष्ट करणार याबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस म्हणजे 23 जानेवारी हा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94वी जयंती असून हे औचित्य साधत मनसेसोबतच शिवसेनेनंही मेळावा आयोजित केला आहे. शिवसेनेचा 'वचनपूर्ती जल्लोष' सोहळाही बीकेसीत होणार आहे. राज ठाकरे हे महामेळाव्यात भाषण करतील तर उद्धव ठाकरे हे सरकारची भूमिका मांडतील. हे निमित्त साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नवीन पक्षाची काय भूमीका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर राहणार असल्याची माहिती आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरला अधिवेशनासाठी 20 ते 25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळच आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा-साईंच्या जन्मगावाचा वाद सुरू असताना आणखी एका गावाची उडी, काय आहे नवा दावा?
मनसेचे महाधिवेशना निमित्त मुंबईत ठिकठिकाणी मनसेकडून बॅनरबाजी केली जातेय. त्या बॅनरवरुन मनसेचा पूर्वीचा झेंडा गायब आहे. नव्या झेंड्याचे स्वरुप कसे असणार हे जरी अजून स्पष्ट नसले तरी नव्या झेंड्याचा रंग हा भगवा असणार आहे. यावरून राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका अजून ठळक होत आहे.
शिवसेनेचंही शक्तिप्रदर्शनशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त 'शिवसेना वचनपूर्ती जल्लोष' सोहळ्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जाहीर सत्कार होणार आहे. हा सत्कार सोहळा वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वर्षी शिवसेनेची स्थापना केली होती. त्यावेळच्या शिवसेनेच्या पहिल्या फळीतील जेष्ठ शिवसैनिकांना या सत्कार सोहळ्यात गौरव होणार आहे.
हेही वाचा-मुंबईला हादरवणारा डॉन मन्या सुर्वे हा माझा भाऊ, नाना पाटेकरांचा मोठा खुलासा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.