उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला रवाना, महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला रवाना, महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील उद्धव यांच्यासोबत पवारांच्या भेटीसाठी रवाना झाले असल्याची माहिती आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याची माहिती आहे. सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्यात यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्याकडे करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील उद्धव यांच्यासोबत पवारांच्या भेटीसाठी रवाना झाले असल्याची माहिती आहे.

सत्तास्थापनेबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती. यावेळी शरद पवारांनी उद्धव यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच त्यानंतर आता उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

ठाकरे-पवार युती? महाराष्ट्राच्या राजकारणाचं नवं पर्व

महाराष्ट्राच्या राजकारणात पवार-ठाकरे संघर्षाची मोठी चर्चा झाली आहे. मात्र आता बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे हे दोन्ही राजकीय घराणी एकत्र येण्याच्या स्थितीत आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकमेकांवर जहरी टीका करायचे. पण त्याचवेळी दोघांनीही मैत्रीचं नातं कधी तोडलं नाही. असं असलं तरीही शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय संघर्ष मात्र कायम राहिला. आता मात्र या संघर्षाचं रूपांतर युतीत होणार असल्याचं दिसत आहे.

शिवसेना NDA तून बाहेर पडणार?

भाजप-शिवसेनेत मोठा संघर्ष झाल्यानंतर शिवसेनेनं मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राजीनामा देण्याआधी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर ते पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे.

शिवसेना आज दिल्लीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. फक्त केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा नाही तर थेट एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर दिल्लीत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच आता आणखीन वाढला आहे. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आपण असमर्थ असल्याचं सांगितलं. त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. त्यांना सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवेसेनेच्या एकमेव केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं ट्विटरवरून सांगितलं.

राज्यात महायुतीने एकत्र निवडणुका लढवल्या पण निकालानंतर भाजप-सेनेमध्ये बिनसलं. शिवसेना मुख्यमत्रिपदावर ठाम राहिली तर भाजपने असं काही ठरलंच नाही म्हटलं. अखेर मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावाही करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

सत्तासंघर्षात भाजपकडून नवी खेळी; संजय राऊत यांचा गंभीर आरोप, पाहा UNCUT VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: November 11, 2019, 1:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading