'अशा औलादी समाजात नसलेल्या बऱ्या', उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर विखारी टीका

'अशा औलादी समाजात नसलेल्या बऱ्या', उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर विखारी टीका

दिलीप सोपल यांच्या प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर चौफेर टीका केली आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, बार्शी, 14 ऑक्टोबर : 'शरद पवार टीका करतायत की सरकार चालवणार की स्वयंपाक करणार? जनतेसाठी माझी स्वयंपाकही करायची तयारी आहे. पण स्वयंपाकासाठी पाणी तुमच्या धरणातले नको. अशा औलादी समाजात नसलेल्या बऱ्या,' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूरमधील बार्शी इथं बोलताना राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली आहे.

'यशासाठी मी स्वतःच्याच सरकारच्या पाठीत, वसंतदादांच्या पाठीत वार केल्याप्रमाणे करणार नाही,' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं. बार्शीतील शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर चौफेर टीका केली आहे.

दिलीप सोपल यांच्यावर स्तुतीसुमने

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिलीप सोपल यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत. दिलीपराव आमचा तुमच्यावर खूप डोळा होता. मात्र आमचा डोळा चुकवून तुम्ही इकडे तिकडे जात होतात. मर्द गडी आता पुन्हा शिवसेनेत आलेला आहे. दिलीपराव तळमळीने, मतदारसंघाचे प्रश्न घेऊन माझाकडे आले आहेत,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उध्दव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- सरकार आल्यानंतर पहिल्यांदा वैरागला तालुका करणार

-कठीण गोष्ट साध्य करण्यासाठीच सरकार असते आणि ते सरकार निवडण्याचे काम तुम्ही करायचे असते

- आमची हौस भागवण्यासाठी नव्हे तर तुमची तहान भागविण्यासाठी आम्हाला निवडून द्या

- पाच वर्षात सरकारने खूप चांगली कामे केली आहेत

- सत्तेत असताना न पटणाऱ्या गोष्टी मी बोललो आणि बोलत राहील

- मी सत्तेला बांधिल आहे. सरकारचे कान उपटण्याचे काम मी केले आणि करत राहणार

- शरद पवार बिनधास्त उडी मारतात आणि परत बोंबलत बसतात चुकलो चुकलो म्हणून

- सरकार अस्थिर होते म्हणून मी हिंदुत्त्वासाठी सरकार स्थिर केले.

VIDEO : 'निलेशने विचारलं शिवसेनेनं दिलेला त्रास विसरलात का?' नितेश राणे म्हणाले...

Published by: Akshay Shitole
First published: October 14, 2019, 5:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading