उद्धव ठाकरेंवरही ED चा दबाव? पहिल्यांदाच दिलं उत्तर

ईडीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक उत्तर देत इशाराही दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 12:41 PM IST

उद्धव ठाकरेंवरही ED चा दबाव? पहिल्यांदाच दिलं उत्तर

मुंबई, 8 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात ईडीचा मुद्दा सर्वाधिक गाजला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. या प्रकरणात शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने त्याचा राष्ट्रवादीला फायदाच झाल्याचं बोललं गेलं. पण त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामागेही ईडीचा ससेमिरा लागू शकतो, अशी चर्चा सुरू झाली. याबाबत आता शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

'तुमच्यावर सुद्धा ईडाचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे, त्याबद्दल काय सांगाल?', असा प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, 'काय ते ईडी? मला नका सांगू त्या गोष्टी. कर नाही त्याला डर कशाला? मी लढणाऱ्या पित्याचा लढणार पुत्र आहे. माझे आजोबासुद्धा योद्धा होते. मी घाबरत नाही. उगाच भलतेसलते प्रयोग करू नका.' ईडीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक उत्तर देत इशाराही दिला आहे.

युतीतील तडजोडीवर भाष्य

उद्धव ठाकरे यांच्या संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग नुकताच प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी उद्धव यांनी युतीत शिवसेनेनं तडजोड केली आहे का, यावर भाष्य केलं होतं. महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेनेने तडजोड केली असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला सांभाळून घ्या अशी विनंती केली होती त्यामुळे तडजोड केली असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काही जागांसाठी खळखळ करत बसण्यापेक्षा राज्याचं हित पाहणं महत्त्वाचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'यावेळी शिवसेनेला सर्वात कमी जागा मिळाल्यात हे खरं आहे. मात्र त्याच वेळी हेही लक्षात घ्या की यावेळी शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडणून येणार आहेत,' असा दावा उद्धव यांनी केला. सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने भाजपने आपली अडचण समजून घ्या अशी विनंती केली होती. ती विनंती आम्ही मान्य केली. त्यात फार काही मोठं नाही असंही ते म्हणाले.

Loading...

युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2019 12:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...