अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देणार असाल तरच फोन करा, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देणार असाल तरच फोन करा, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे भाजपसह इतरही सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं.

  • Share this:

मुंबई, 7 नोव्हेंबर : भाजपसोबत सत्तास्थापनेबाबत संघर्ष निर्माण झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे भाजपसह इतरही सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची भूमिका समोर आली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर अजूनही ठाम आहेत. 'मला स्वतःहून युती तोडायची नाही. भाजपने काय तो निर्णय घ्यावा. लोकसभेवेळी जे ठरलं त्याप्रमाणे व्हावं. भाजप अध्यक्ष अमित शाहा यांच्यासोबत सगळे ठरलं होतं. समसमान वाटप हा फॉर्म्युला होता. युती कायम राहावी हीच इच्छा आहे. मात्र भाजपनं दिलेला शब्द पाळावा. ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे देणार असाल तरच भाजपने फोन करावा,' अशी भूमिका या बैठकीत उद्धव ठाकरेंनी घेतल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे अजूनही मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

शिवसेना आमदारांनी काय घेतली भूमिका?

'सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतली तो सर्वांना मान्य असेल,' असा एका ओळीचा ठराव या बैठकीत शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मान्य केला आहे. तसंच शिवसेना मुख्यमंत्रिपदच मिळावं, या मागणीबाबत सर्व आमदारांचं एकमत झालं आहे.

'शिवसेनेचा मुख्यमंत्री होणं हा आमच्यासाठी सर्वोच्च आनंद असेल,' असं शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही मातोश्रीच्या आदेशाचे भुकेलेलो आहोत, असं म्हणत शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी बैठकीनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच या बैठकीनंतर सर्व शिवसेना आमदारांना रंगशारदा हॉटेल इथं जाण्याचा आदेश पक्षाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळातही मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आक्रमकच राहणार अशी स्थिती आहे.

VIDEO : काँग्रेसचाही प्लॅन तयार, 'या' नेत्याने केला मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 02:24 PM IST

ताज्या बातम्या