भाजपसोबत सत्तासंघर्ष सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी घेतला 'हा' निर्णय

सत्तास्थापनेबाबत दोन्ही पक्षांमध्ये अजूनही चर्चेला सुरुवात झालेली नाही.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 02:22 PM IST

भाजपसोबत सत्तासंघर्ष सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी घेतला 'हा' निर्णय

औरंगाबाद, 2 नोव्हेंबर : विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपसोबत सुरू असलेला शिवसेनेचा सत्तासंघर्ष टोकाला गेला आहे. सत्तास्थापनेबाबत दोन्ही पक्षांमध्ये अजूनही चर्चेला सुरुवात झालेली नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात येत आहेत. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांना भेटून शेती नुकसानीचा आढावा घेणार आहेत. शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे हे आज उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकीकडे सत्तेची कोंडी फुटत नसताना उद्धव ठाकरे मात्र मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याने हा पेच कसा सोडवला जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजप-शिवसेनेत अजूनही तणाव

'भाजपच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी दिली आहे. ही धमकी म्हणजे जनादेशाचा अपमान आहे. राष्ट्रपती कोणाच्या खिश्यात नाही. राष्ट्रपतींना या गोंधळात ओढू नये,' असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे.

'युतीत कोणतीही चर्चा झाली नाही. युतीच्या चर्चेच्या बातम्या खोट्या आहेत. कोणी शपथविधीचा मुहूर्त काढत असेल तर तो मुहूर्त महत्त्वाचा नाही. बहुमताचा मुहूर्त महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होईल,' असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Loading...

शेतकरी संकटात

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. शेतातील काढणीला आलेले सोयाबीन, कापूस, बाजरी मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. त्यामुळे सोयाबीन जाग्यावर उगवून आली तर मक्याच्या कणसाला पालवी फुटली आहे. कापसाच्या पूर्णपणे 'वाती' झाल्या आहेत. एकीकडे दिवाळी साजरी केली जात असताना या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाची 'होळी' केली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने तात्काळ मदत दिली तर शेतकऱ्यांला आधार मिळू शकतो.

VIDEO : 'नेत्यांना सुबुद्धी देवो' भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 12:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...