उद्धव ठाकरे जाणार शरद पवारांच्या भेटीला? उलथापालथ होणार

उद्धव ठाकरे जाणार शरद पवारांच्या भेटीला? उलथापालथ होणार

राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी मागणी करण्यासाठी उद्धव ठाकरे हे शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : सत्तास्थापनेबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य शरद पवार यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी मागणी करण्यासाठी उद्धव ठाकरे हे शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती आहे. यावेळी शरद पवारांनी उद्धव यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच आता उद्धव ठाकरे पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेनेला राज्यपालांचं निमंत्रण

सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्तास्थापनेस असमर्थता दाखवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केलं आहे. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केल्यानंतर प्रतिसाद देण्यासाठी 24 तासांचा अवधी दिला आहे.

काय आहे राष्ट्रवादीची भूमिका?

भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर आता शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सत्तासमीकरणांवर राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'शिवसेनेनं आधी एनडीएतून बाहेर पडावं. तसंच त्यानंतर सत्तास्थापनेसाठी आमच्याकडे प्रस्ताव द्यावा. त्यानंतर याबाबत पक्षाकडून विचार केला जाईल,' असं राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

VIDEO : राज्यपाल तसा निर्णय घेऊ शकत नाही? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2019 08:40 PM IST

ताज्या बातम्या