मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यामुळे युतीत वाढली दरी, उद्धव ठाकरे म्हणाले...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 02:52 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यामुळे युतीत वाढली दरी, उद्धव ठाकरे म्हणाले...

मुंबई, 31 ऑक्टोबर : 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेवर बोलायला नको होतं. अजून भाजपकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. सर्व गोष्टी मान्य करायला आपण कपाळ करंटे नाहीत. भाजपला आपण अजूनही मित्र मानतो. त्यांनी असं वागायला नको होतं,' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली आहे.

'अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद असं काही युतीमध्ये ठरलं नव्हतं. येणाऱ्या सरकारमध्येही मीच मुख्यमंत्री राहणार,' असा दावा काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या याच दाव्यामुळे शिवसेना-भाजपची नियोजित बैठक रद्द करण्यात आली. तसंच अजूनही सेना नेत्यांकडू याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या परिस्थितीवर दोन्ही पक्ष कसा तोडगा काढणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेनंही आपल्या विधीमंडळ पक्षनेत्याची निवड केली आहे. शिवसेनेकडून विधीमंडळ पक्षनेतेपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. युवासेनाप्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला शिवसेनेच्या इतर आमदारांनी अनुमोदन देत एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड केली.

सत्तास्थापनेआधी शिवसेनेच्या सर्व आमदारांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीतच विधीमंडळ नेतेपदाचा निर्णय घेण्यात आला. तसंच आमदार सुनील प्रभू यांची शिवसेना पक्षप्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे.

VIDEO : मीरा-भाईंदरमध्ये तरुणांची गुंडगिरी, तलवारीनं दोघांवर जीवघेणा हल्ला

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 02:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...