'चुकीच्या लोकांसोबत गेलो याचं दु:ख', उद्धव ठाकरेंकडून युती तुटल्याचे संकेत?

'चुकीच्या लोकांसोबत गेलो याचं दु:ख', उद्धव ठाकरेंकडून युती तुटल्याचे संकेत?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : 'बहुमत नसताना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणतात सरकार आमचं येणार. हे सरकार कसं येणार? लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा युती केली. आपण चुकीच्या लोकांसोबत गेलो याचं मला दु:ख आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, हा बाळासाहेबांना दिलेला शब्द मी खरा करून दाखवणार,' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

'अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्रिपद अडीच वर्ष मिळेल, असं ठरलं होतं. तसंच मुख्यमंत्र्यांनीही पद आणि जबाबदारी यांचं समसमान वाटप होईल, असं जाहीर केलं होतं. मग मुख्यमंत्री हे पद नाही का? की मुख्यमंत्रिपद ही जबाबदारी नाही?,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फॉर्म्युला ठरला नव्हता हा देवेंद्र फडणवीस यांचा दावा खोडून काढला आहे.

'आम्हालाही पर्याय खुले आहेत'

येत्या काळात शिवसेनेसमरो इतर पर्यायही उपलब्ध आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या राजकीय समीकरणांचे संकेत दिले आहेत. 'मला एका गोष्टीचं वाईट वाटलं, की माझ्यावर खोटरडेपणाचा आरोप लावला. अमित शाह आणि कंपनीने माझ्यावर कितीही आरोप लावले तरी जनतेला माहीत आहे की आमच्यात काय ठरलं आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी युती करण्यासाठी मी काही लाचार नाही,' असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:

- मला असला खोटा नेता नको

- दोन वेळा नरेंद्रभाईंनी मला छोटा भाऊ म्हटल्यावर काहींच्या पोटात गोळा आला

- महाराष्ट्र आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही

- गंगा साफ करता करता यांची मन खराब झाली

- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल मला आदर आहे

- संघाने विचार करावा खोटं बोलणं हिंदुत्वात बसतं का?

- काही वेळापूर्वी मी महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघितली आणी काळजी वाटली

- गेल्या 5 वर्षात जनतेच्या हिताचे प्रश्न मांडताना लोकांना आम्ही सत्तेतः आहोत आणि विरोधातही आहोत असं वाटलं

- पद आणि जबाबदारी यांच्यात समसमान वाटप असं मुख्यमंत्री म्हणाले होते

- सत्तेचं स्वप्न माणसांना किती वेडी करते

- मी चर्चा थांबवली. कारण मुख्यमंत्र्यांनी मला खोटं पडायचा प्रयत्न केला

- त्यांचं स्टेटमेंट मला दुःख देणार होतं

- मी अजूनही भाजपला शत्रूपक्ष मानत नाही

- साताऱ्याची जागा माझ्याशी चर्चा न करता उदायनराजेंना दिली

- मी मोदींवर टीका केली नाही

VIDEO : युती तुटली का? देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 06:53 PM IST

ताज्या बातम्या