दगाबाजी करू नका, आमचे उमेदवार तयार आहेत; शिवसेनेचा स्वबळाचा इशारा

दगाबाजी करू नका, आमचे उमेदवार तयार आहेत; शिवसेनेचा स्वबळाचा इशारा

'उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनाने आदित्य साहेबांच्या नेतृत्वात नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे युती करायची तर लवकर करा. मात्र, युतीमधील शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभा करू नका. आम्ही भाजपाच्या जागेच्या विरोधात शिवसेनेचा एकही उमेदवार उभा करणार नाही.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर : 'युती करायची असेल तर लवकर करून टाका, नाहीतर आमचे उमेदवार तयार आहेत' असा थेट इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. खरंतर युती होणार हे 100 टक्के असलं तरी जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नाही आहे. त्यामुळे उमेदवारांची नावं आणि कोणते मतदार संघ कोणाच्या पारड्यात असा संभ्रम आहे. या सगळ्यात शिवसेना आणि भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा असल्यामुळे एकदा काय तो युतीचा निर्णय घ्या नाहीतर आमचे उमेदवार स्वबळावर लढणार असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे.

'उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनाने आदित्य साहेबांच्या नेतृत्वात नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे युती करायची तर लवकर करा. मात्र, युतीमधील शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभा करू नका. आम्ही भाजपाच्या जागेच्या विरोधात शिवसेनेचा एकही उमेदवार उभा करणार नाही. पण युती करायची नसेल तर बीडच्या 6 जागांवर माझे उमेदवार तयार आहेत. त्यांनी युती तोडली तर आम्ही तयार आहोत' असा सूचक इशारा चंद्रकांत खैरे यांनी भाजपाला दिला आहे.

ते बीडमधील शिवसेनेच्या कार्यकता मेळाव्यात बोलत होते. यावेळी रोहयो मंत्री जयदत्त क्षिरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षिरसागर, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना खैरे म्हणाले की, माझ्या लोकसभा निवडणुकीत कोणी झपका दिला माहित आहे. दगाबाजीचा फटका बसला आहे.' विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आयोजित शिवसैनिकांच्या स्नेह मेळाव्याच्या आयोजनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत खैरे यांनी वज्रमुठ आवळून कामाला लागण्याचे आदेश दिले.

'कोणत्याही परिस्थितीवर बीड विधानसभा मतदार संघावर भगवा फडकावयाचा आहे . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. असं खैरे म्हणाले. तर बीडच्या दोन जागा आपण मिळवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. खरंतर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमधून जोरदार इनकमिंग झालं. त्यामुळे दोन्ही पक्षांचं पारड जड आहे. या मेगाभरतीमुळे आता युतीत जागावाटपावरून ठिणगी पडली आहे. तर महत्त्वाच्या जागांची अदलाबदलही होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे युती झाली तरी नेमक्या कोण लढणार आणि किती जागांवर युतीचा फॉर्म्युला ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

इतर बातम्या - मोदींनी पाकला सुनावलं, स्वत:चा देश सांभाळता येत नाही त्यांनी भारताला बोलू नये

21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि हरियाणा या 2 राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युती होणार हे 100 टक्के नक्की असलं तरी जागावाटपाबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना 126 जागांवर ठाम आहे तर भाजप 120 पैकी एकही जागा देण्यासाठी तयार नाही आहे. त्यामुळे शिवसेनेला कमी जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसभेमध्ये युतीसाठी 50-50 फॉर्म्युला वापरण्यात आला होता तोच विधानसभेवेळीही वापरण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि सेनेमध्ये जोरदार इनकमिंग झालं. त्यामुळे दोन्ही पक्षांचं पारडं जड आहे. असं असताना 50-50च्या फॉर्म्युल्याने दोन्ही पक्षांना अडचणी येतील. तर मोठा पक्ष म्हणून भाजप 120 जागेच्या वर एकही जागा शिवसेनेला देण्यासाठी तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना 120 जागांवर तर 168 जागांवर मित्रपक्षांसह भाजप निवडणूक लढेल असं समीकरण भाजपचं आहे. पण जर भाजपने विधानसभेत 145 जागा जिंकल्या त्यांना शिवसेनेला विश्वासात घेण्याची गरज लागणार नाही अशी भीती शिवसेनेची आहे. त्यामुळे ते 126 जागांवर ठाम असल्याचं सांगण्यात येत आहे.

VIDEO: 'बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा आमचा राजा होता'; पवारांचा उदयनराजेंना टोला

Published by: Renuka Dhaybar
First published: September 23, 2019, 7:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading