मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : मागच्या वेळी गोरेगाव रेल्वे स्टेशन, रामनगर वार्डात शिवसेना विजयी; यावेळी काय होणार?

BMC Election 2022 : मागच्या वेळी गोरेगाव रेल्वे स्टेशन, रामनगर वार्डात शिवसेना विजयी; यावेळी काय होणार?

या वार्डसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे.

या वार्डसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे.

या वार्डसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 8 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. याच मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 54 बद्दल. (Ward no. 54) वार्ड क्रमांक 54 गोरेगाव रेल्वे स्टेशन हा दक्षिण मुंबईत येतो. या वार्डामध्ये यशोधाम विद्यालय, माळीनगर, गोकुळधाम, रामनगर, गोरेगाव रेल्वे स्टेशन परिसर आहेत. याठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे. 2017च्या मनपा निवडणुकीत या वार्डात शिवसेनेची बाजी मारली होती. त्यावेळी याठिकाणी शिवसेना उमेदवार साधना माने यांनी बाजी मारली होती. त्यांना 8363 इतकी मते मिळाली होती. त्यांनी प्रमुख विरोधी पक्ष भाजपच्या उमेदवार सानिका वझे यांना मात दिली होती. या वार्डसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा याठिकाणी प्रमुख विरोधी पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. 2017मध्ये याठिकाणांहून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेना, भाजप, काँग्रेस , मनसे ,बहुजन समाजवादी पार्टी, आरपीआयसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र, मतदारांनी कौल हा शिवसेनेला दिला होता. या वार्डातील मतदारांची एकूण संख्या 39099 इतकी आहे. तर एकूण लोकसंख्या ही 48144 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 3934 इतकी, अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही 1289 इतकी आहे. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते -
  1. साधना माने, शिवसेना - 8363
  2. सानिका वझे, भाजप - 6901
  3. कांचन प्रजापती, काँग्रेस - 2903
  4. सुनीता चुरी, मनसे 1346
  5. राजश्री विश्वासराव, अपक्ष - 1036
  6. छाया राऊत, अपक्ष - 479
  7. धबाले रेखा, बसपा - 174
  8. वैशाली पगारे, राष्ट्रवादी काँग्रेस - 143
हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर - नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. या वार्डात काय होते ते पाहणे महत्त्वाचे आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या