पिंपरीतील शिवसेना उमेदवार अडचणीत, आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल

पिंपरीतील शिवसेना उमेदवार अडचणीत, आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी, 11 ऑक्टोबर : शिवसेनेचे पिंपरीतील उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी पदयात्रा काढून प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार व शिवसेना नगर सेवक प्रमोद कुटे यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी या मुद्द्यावरून आता शिवसेनेला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून पिंपरीचं राजकारण तापण्याची शक्यता आहे.

पिंपरी मतदारसंघात आधी बंडखोरीमुळे युतीची डोकेदुखी वाढली होती. मात्र मुख्यमंत्री आणि चंद्रकात पाटील ह्यांच्या शिष्टाई फळाला आली. या मतदारसंघात बंडखोरी करणारे भाजपचे नेते आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, भीमा बोबडे आणि RPI च्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी माघार घेतली. त्यामुळे आता शिवसेनेतर्फे गौतम चाबुकस्वार, वबुआचे बाळासाहेब गायकवाड आणि राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.

दरम्यान, कधीकाळी बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, पिंपरी मतदार संघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेल्या सुलक्षणा शिलवन्त यांची उमेदवारी रद्द करून राष्ट्रवादीने अण्णा बनसोडे यांना ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

जाणिवा नसलेली लोकं म्हणजे जिवंत प्रेत? राज ठाकरेंचं गोरेगावमधील UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 01:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading