भाजप-सेनेच्या युतीसाठी गेल्या 4 महिन्यांपासून गुप्त बैठका

भाजप-सेनेच्या युतीसाठी गेल्या 4 महिन्यांपासून गुप्त बैठका

गेल्या 4 महिन्यांपासून युतीसाठी गुप्त बैठकांचा सिलसिला सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 6 जानेवारी : भाजप आणि शिवसेनेमध्ये गेल्या 4 महिन्यांपासून युतीसाठी गुप्त बैठकांचा सिलसिला सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे युतीबाबत आमच्यामध्ये अजून प्रत्यक्ष चर्चा झाली नाही, असा दोन्ही पक्ष करत असलेला दावा खोटा ठरला आहे. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

युतीच्या चर्चेत काय झालं?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत युती करण्यासंदर्भात ही चर्चा झाली आहे. युती करण्याबद्दल भाजप आग्रही आहे. मात्र शिवसेना आडमुठी भूमिका घेत असल्याची भाजपची तक्रार असल्याची माहिती आहे.

कोणत्या नेत्यांमध्ये झाली चर्चा

भाजप नेतृत्वानं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर युतीबाबतच्या चर्चेची जबाबदारी सोपवली आहे. तर शिवसेनेकडून सुभाष देसाई हे चर्चेत भाजपतर्फे जावडेकर, चंद्रकांत पाटील तर शिवसेनेतर्फे सुभाष देसाई चर्चेत सहभागी झाले होते, अशी माहित आहे. या तीन नेत्यामध्ये गेल्या चार महिन्यांपासून बैठकाही सुरू आहेत.

दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेची जय्यत तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही पक्षांकडून आघाडीसाठीची बोलणी अंतिम टप्पात आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभेच्या प्रत्येकी 24 जागा लढवणार हे आता नक्की झालं आहे. तसंच त्यातील दोन्ही पक्ष आता आपल्या वाट्यातून मित्रपक्षांना काही जागा देणार आहेत. राज्यात भाजपविरोधात महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. बऱ्याच बैठकानंतर दोन्ही पक्षांचं आता जागावाटपावर एकमत झालं आहे.

राष्ट्रवादीची तयारी सुरू

काँग्रेससोबत आघाडीची बोलणी पूर्ण झाल्यानंतर आता राष्ट्रवादीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. आपल्या वाट्याच्या 24 जागांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक लवकरच बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वा ही बैठक होईल. आघाडीत आपल्याला मिळालेल्या कोणत्या जागा मित्रपक्षांना सोडाव्यात, तसंच कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार प्रभावी ठरेल, यावर राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

VIDEO : राज ठाकरेंच्या मातोश्री भेटीचा राजकीय अर्थ काढावा? विश्लेषक म्हणतात...

First published: January 6, 2019, 9:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading