'अमित शहा, मुख्यमंत्री आणि आमचं ठरलं आहे, यात कोणी नाक खुपसू नये'

'अमित शहा, मुख्यमंत्री आणि आमचं ठरलं आहे, यात कोणी नाक खुपसू नये'

'शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, ज्या गोरगरीब शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिलं त्यांचे प्रश्न सोडवणे हे मुख्यमंत्री कोण होणार या विषयापेक्षा अधिक महत्वाचे आहे' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी

मुंबई, 22 जून : एकीकडे मुख्यमंत्री हा भाजपचाच असणार असं भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे तर युतीबाबत आमचं ठरलं, त्यामुळे त्यात कोणी नाक घालू नका अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. 'भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचं युती बाबत ठरलं आहे. त्यामुळे इतर कोणी त्यात तोंड घालू नये' अशी प्रतिक्रीया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

पत्रकारांनी गिरीश महाजन यांच्या 'मुख्यमंत्री भाजपचाच होणार' या वक्तव्यावर प्रतिक्रीया विचारली असता ते बोलत होते. 'शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, ज्या गोरगरीब शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिलं त्यांचे प्रश्न सोडवणे हे मुख्यमंत्री कोण होणार या विषयापेक्षा अधिक महत्वाचे आहे' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळाला का?, उज्वला गॅस योजनेचा लाभ किती गरीबांना मिळाला?, गॅस घरोघरी खरोखरच पोहोचले आहेत का?, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का?, शेतकरी कर्जमुक्त झाला का?, या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे' असे अनेक प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री पद महत्त्वाचं नाही तर महाराष्ट्रातील प्रश्न महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, 'शिवसेना सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सरकारमधे आहे. शेतकऱ्यांनी आपली दुःख बाजूला ठेऊन आपल्याला लोकसभा निवडणुकीत निवडून दिले आहे. आता त्यांची दुःख दूर करणं हे आपले कर्तव्य आहे' असेही ते म्हणाले. पण उद्धव ठाकरे जरी आमचं ठरलं असं म्हणत असले तरी गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा ठिणगी पडू शकते.

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षा काही लपून राहिल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी सामनातून याबाबत जाहीर भाष्य केलं होतं. 'आमचं सगळं ठरलं आहे. यापुढे सगळं समसमान पाहिजे,' अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच जाहीर केली.

VIDEO : रुग्णालयात झोपलेले असताना शर्टात घुसला साप, तरीही आजोबा ढाराढुर झोपले!

दरम्यान, शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. शिवसेना भवनात काल (शुक्रवारी)शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुखांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोणीही असो, त्याच्या विजयासाठी महायुतीच्या सर्व पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावं यासाठी हे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आहे.

रिक्षाचालकाने पॅन्टने साफ केली रस्त्यावर पडलेली रेती, VIDEO व्हायरल

First published: June 22, 2019, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading