'युतीचा फॉर्म्युला शिवसेनेनं पसरवला', मतभेद कायम?

'युतीचा फॉर्म्युला शिवसेनेनं पसरवला', मतभेद कायम?

निवडणुकीच्या घोषणेनंतरही अद्याप युतीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

  • Share this:

पायल मेहता, मुंबई, 27 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला हा फॉर्म्युला मान्य नाही. समोर आलेले युतीबाबतचे आकडे हे शिवसेनेकडून पसरवले जात आहेत, असं राज्यातील भाजप नेतृत्वाचं म्हणणं असल्याची माहिती 'CNN NEWS 18' ला सूत्रांकडून मिळाली आहे.

निवडणुकीच्या घोषणेनंतरही अद्याप युतीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र काल युतीचा फॉर्म्युला निश्चित झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यामध्ये भाजप 144, शिवसेना 126 तर मित्रपक्षाला 18 जागा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं गेलं. मात्र भाजपच्या नेतृत्वाला हा फॉर्म्युलाही मान्य नसल्याचं कळतंय.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमेटीची बैठक गुरूवारी सायंकाळी दिल्लीत झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, बी. एल. संतोष, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा, व्ही. सतीश, राज्य संघटक विजय पुराणिक आदी नेते उपस्थित होते. बैठकीमध्ये जवळपास 112 उमेदवारांच्या नावांवर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीनंतर निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी पुन्हा एक बैठक होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

भाजपच्या प्रचाराचा 'मास्टर प्लान'

भाजपच्या कोअर कमेटीच्या बैठकीत निवडणूक प्रचाराच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. निवडणूक महाराष्ट्रात होत आहे, पण भाजपच्या प्रचाराचा 'मास्टर प्लान' दिल्लीत तयार करण्यात येत आहे. प्रचाराचे मुद्दे, विरोधकांवर करण्याचा हल्लाबोल आणि इतर रणनीतीवर या बैठकीत आराखडा तयार करण्यात येणार आहे.

दरम्यान, जागावाटपात 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम होता. भाजपकडून चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. तरीही शिवसेनेला कमी जागा मान्य नव्हत्या. बदलती राजकीय परिस्थिती इतर पक्षांमधल्या नेत्यांचे भाजपमध्ये येणे. लोकसभेनंतर वाढलेली ताकद यामुळे जास्त जागा मिळाव्यात, या मागणीवर भाजप नेते ठाम आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 09:23 AM IST

ताज्या बातम्या