बाळासाहेब ठाकरेंनी आमदाराचा ‘माकड’ असा केला होता उल्लेख, आता पुन्हा शिवसेनेत प्रवेश; VIDEO व्हायरल

दिलीप सोपल यांच्या शिवसेना प्रवेशानंतर सोलापूर जिल्ह्यात एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 11:05 AM IST

बाळासाहेब ठाकरेंनी आमदाराचा ‘माकड’ असा केला होता उल्लेख, आता पुन्हा शिवसेनेत प्रवेश; VIDEO व्हायरल

सोलापूर, 29 ऑगस्ट : सोलापूरमधील बार्शी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर दिलीप सोपल यांनी हाती शिवबंधंन बांधलं. पण दिलीप सोपल यांच्या शिवसेना प्रवेशानंतर सोलापूर जिल्ह्यात एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या दिलीप सोपल यांच्यावर जहरी टीका केली होती. या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांनी सोपलांचा 'माकड' असा उल्लेख केला होता. तसंच 'गद्दारांना गाडा' असं म्हणत सोपलांचा पराभव करण्याचं आवाहन केलं होतं. आता दिलीप सोपल यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा हाती घेतल्यानंतर बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडवार दिलीप सोपल यांची चांगलीच गोची झाली आहे. आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जाणारे दिलीप सोपल या व्हिडिओ प्रकरणावर काय टोलेबाजी करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सोपल यांचा शिवसेनेत प्रवेश

Loading...

बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा दोन महिन्यांपासून सुरू होती. सोपल यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीला दांडी मारली होती. त्याचवेळी सोपल यांनी बार्शीत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला. तेव्हाच दिलीप सोपल हे शिवसेनेत प्रवेश करतील, हे जवळपास निश्चित झालं. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून अखेर सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला दुहेरी धक्का बसला आहे. कारण करमाळ्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनीही नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवलेले संजयमामा शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे या अडचणीवर राष्ट्रवादी कसा मार्ग काढणार, पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO: 'राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला जायला कुणीही तयार नाही', दानवेंकडून शिवस्वराज्य यात्रेची खिल्ली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 11:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...