आमचं ठरलंय, आता सगळं समसमान पाहिजे - उद्धव ठाकरे

आमचं ठरलंय, आता सगळं समसमान पाहिजे  - उद्धव ठाकरे

'जे सावरकरांना डरपोक म्हणत होते, त्या नालायकांचा दणदणीत पराभव झाला याचा आनंद आहे.'

  • Share this:

मुंबई, 19 जून: शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा निर्धार व्यक्त करत. दोनही नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्ट खुलासा केला नाही. मात्र आमचं सगळं ठरलंय. योग्य वेळी जाहीर करू असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता सगळं समसमान पाहिजे असंही ते मुख्यमंत्र्यांकडे पाहुन म्हणाले. आता यापुढे एका युतीची पुढची गोष्ट असेल असंही ते म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

कलम ३७० आम्ही काढणार म्हणजे काढणारच, काश्मीर वर आमच्या देशाचा हक्क आहे. जे सावरकरांना डरपोक म्हणत होते, त्या नालायकांचा दणदणीत पराभव झाला आहे.  आपला वाद होता ते तुझं माझं करण्यासाठी नाही होता, आपला वाद मूलभूत मुद्द्यांसाठी झाला होता. ज्या एका भावनेने युती आपण त्या वेळेला केली होती ती आजही त्याच भावनेने केली आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, संघर्षाच्या वेळी मला शिवसेनाप्रमुखांची आठवण येत नाही, कारण असे शिवसैनिक वीर सवंगडी त्यांनी मला दिले आहेत.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सर्वात मोठा खुलासा केलाय. आम्ही सर्व ठरवलं आहे. कुणाला काय चर्चा करायची ते करू द्या. आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय सांगू असं मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतच खुलाचा केला. ते म्हणाले,  मी इथे आलोय तमाम शिवसैनिकांची ऊर्जा घेण्यासाठी. आपल्या घरातही जेंव्हा दोन भाऊ एकत्र रहातात तेंव्हा कधी कधी ताण तणाव होतात. आत जो काही ताण तणाव होता तो आता दूर झालांय. जेव्हा वाघ आणि सिंह एकत्र येतो तेंव्हा राजा कोण असणार हे सांगायला नको. मग किती ही आघाड्या असो काहीही फरक पडणार नाही.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीला अभुतपूर्व विजय मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले. एनडीए आणि महायुतीला मिळालेलं यश अभूतपूर्व. यशाचे शिल्पकार हे शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते आहे. मला शिवसेनेच्या मेळाव्यात गेल्यावर मी घरी आलोय असं वाटतं.

कारण आपण भगव्यासाठी आहोत. माझे गुरू भगवा आहे. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. बाळासाहेबांनी राष्ट्रीयत्वच बीजरोपन केलं. महाराष्ट्र आणि राष्ट्र या संकल्पनेतून आपण सुरुवात केली आणि नंतर पक्ष. शिवसेना पक्ष वर्धिष्ट झाला पाहिजे मोठा झाला पाहिजे ,समाजापर्यंत पोचत राहिला पाहिजे या शुभेच्छा

निवडणुकाकरिता एकत्र नाही तर महाराष्ट्रासाठी आलो. सरकारच्या मार्फत शेवटच्या व्यक्तिपर्यंतवपरिवर्तन करण्यास आलो. ऑक्टोबर मध्ये न भूतो असा विजय जनता आपल्याला देणार आहे. आणि आपल्याला देशाच्या जनतेची सेवा करायची आहे.

First Published: Jun 19, 2019 08:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading