मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बीडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद विकोपाला, अजितदादांच्याच कार्यक्रमाला शिवसैनिकांचा विरोध

बीडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद विकोपाला, अजितदादांच्याच कार्यक्रमाला शिवसैनिकांचा विरोध

 बीडमध्ये (beed) विकास कामावरून शिवसेना-राष्ट्रवादीमधील (shivsena-ncp) अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.

बीडमध्ये (beed) विकास कामावरून शिवसेना-राष्ट्रवादीमधील (shivsena-ncp) अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.

बीडमध्ये (beed) विकास कामावरून शिवसेना-राष्ट्रवादीमधील (shivsena-ncp) अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.

बीड, 05 फेब्रुवारी: बीडमध्ये (Beed) विकास कामावरून शिवसेना-राष्ट्रवादीमधील (Shivsena-NCP) अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षांनी थेट विरोध दर्शवला आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 100 कोटीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेनं विरोध केला आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड मतदारसंघातील कामांना विशेष मंजुरी दिलेल्या आहेत. मात्र, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कामांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाकडून आडकाठी आणली जात आहे. हा प्रकार न थांबविल्यास बीड जिल्ह्यात उद्घाटन दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत, असा  इशारा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी दिला आहे. महाविकास आघाडी स्थापन होऊन दोन वर्षे पूर्ण झाली. राज्याच्या हिताच्या व सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी आघाडीची स्थापना करण्यात आली. विकासाला गती मिळावी म्हणून समान विकास कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. परंतु, याचा बीड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला विसर पडला आहे. (दररोज करा 250 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या) शिवसेनेच्या मंत्री आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीने आलेल्या विकासकामांना राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व आडकाठी आणत आहे. याबाबत वरिष्ठांना आपण कळविले आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची होत असलेली अडवणूक येत्या काळात न थांबविल्यास, बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर सोमवारी असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असून ऑनलाईन उद्घाटन जरी असेल तरी अजित दादांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला काळे झेंडे दाखवू, असा इशारा सचिन मुळूक यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीडमध्ये शिवसेना- राष्ट्रवादीमधील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Ajit pawar, Beed, Beed news, Maharashtra, Shivsena, बातम्या, बीड

पुढील बातम्या