भाजपची खेळी उलटवण्यासाठी शिवसेनेचा प्लॅन तयार, उचलणार 'हे' पाऊल

भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला त्यांचे आमदार फुटण्याची भीती सतावत असल्याचं दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 09:42 AM IST

भाजपची खेळी उलटवण्यासाठी शिवसेनेचा प्लॅन तयार, उचलणार 'हे' पाऊल

मुंबई, 7 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीनंतर आक्रमक झालेली शिवसेना अजूनही शांत झालेली नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असं शिवसेना नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. बहुमतासाठी लागणाऱ्या 144 जागांपासून भाजप मागील निवडणुकीच्या तुलनेत जास्तच दूर राहिल्याने शिवसेनेनं संधी साधली आहे. मात्र भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला त्यांचे आमदार फुटण्याची भीती सतावत असल्याचं दिसत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर शिवसेना आपल्या आमदारांना हॉटेल ट्रायडंट इथं हलवण्याची शक्यता आहे. तसंच याआधीही शिवसेनेनं आपल्या काही आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती आहे. नवीन आमदारांना पैशाचं आमिष दाखवून भाजप आपल्याकडे खेचेल, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात असल्याचं बोललं जात आहे.

कर्नाटकात कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यानंतर घोडाबाजाराला ऊत आला होता. अनेक पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिवसेना सतर्क झाली आहे. म्हणूनच शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ज्यात सरकार स्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. सध्याचे सरकार उद्या (शुक्रवारी) विसर्जित होणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीला स्पष्ट कल देऊनही मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेमुळे भाजप आणि शिवसेनेकडून सत्तास्थापनेला विलंब होत आहे. यंदा कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्रिपद मिळवायचंच, या इराद्याने शिवसेना मैदानात उतरली आहे, तर शिवसेनेच्या या मागणीला भाजप अनुकूल नसल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडणार आहेत.

शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. 'जनतेनं भाजप-शिवसेना महायुतीच्या बाजूने कौल दिल्याने त्यांनी सत्ता स्थापन करावी,' अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली असली तरीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग काँग्रेस नेत्यांनी बांधला आहे. त्यामुळे आजचा दिवस सत्तास्थापनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Loading...

VIDEO : काँग्रेसचाही प्लॅन तयार, 'या' नेत्याने केला मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 09:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...