• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • शिवसेनेतही आरोपांचं वादळ, नवनीत राणांच्या विजयावरून मातोश्रीवर नेत्यांची झाडाझडती

शिवसेनेतही आरोपांचं वादळ, नवनीत राणांच्या विजयावरून मातोश्रीवर नेत्यांची झाडाझडती

RPW

RPW

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.

 • Share this:
  अमरावती, 14 जुलै : 'अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी केलेल्या गद्दारींमुळेच झाला,' अशी तक्रार शिवसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा विजयी रॅलीमध्ये अनंत गुढे यांच्या पत्नी विजया गुढे यांनी खासदार राणा यांचा सत्कार केला. तसंच अनंत गुढे यांनी एका सभेत नवनीत राणाच खासदार होणार, असा उल्लेख केला होता. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ अडसूळ यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हवाली केले आहेत. आनंदराव अडसूळ यांच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तातडीने मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. या बैठकीला माजी खासदार अनंत गुढे यांनाही बोलवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मातोश्रीवरून अनंत गुढे यांच्यावर कारवाई करण्यात येणार का, हे पाहावं लागेल. नवनीत राणांनी कशी मारली बाजी? विदर्भात यंदा अमरावती मतदारसंघातली निवडणूक लक्षवेधी ठरली. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने नवनीत राणा कौर यांना पाठिंबा दिला होता. कौर यांनी या निवडणुकीत युतीचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. राणा यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघाची उत्तम बांधणी करून त्यांनी हे यश मिळवलं असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली गेली. नवनीत राणा कौर यांचा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र या पराभवानंतरही त्यांनी आपल्या मतदारांशी असलेला संपर्क कधीच कमी होऊ दिला नाही. त्यांनी सातत्याने संपर्क तर ठेवलाच त्याचबरोबर त्यांच्या मदतीसाठी त्या धावूनही गेल्या. त्यामुळे मतदारांनी त्यांना यावेळी संधी दिली. गेल्या पाच वर्षात त्यांनी 1 हजार 750 गावांना भेटी दिल्या. तसंच अडीच लाख महिलांशी थेट संपर्क साधल्याचं सांगितलं जातं. गेल्या पाच वर्षात नवनीत कौर राणा यांनी किमान दोन लाख महिलांशी सेल्फी काढला असंही सांगितलं जाते. नवनीत या तेलुगू अभिनेत्री असल्याने त्यांच्याविषयी एक आकर्षण आहे. शिवसेनेचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्याविषयी कमालीची नाराजीची भावना होती. त्याचा फायदाही नवनीत कौर यांना मिळाला आणि निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. VIDEO : काँग्रेसला राज्यात मिळाला नवीन 'कॅप्टन' अशोक चव्हाण म्हणतात...
  Published by:Akshay Shitole
  First published: